चंद्रावरील वस्तीच्या तयारीस झाली सुरुवात

0
बीजिंग | वृत्तसंस्था : चीनच्या पहिल्या चांद्र मोहिमेबाबत अद्याप काहीच स्पष्ट झालेले नाही. मात्र, या देशाने पृथ्वीच्या या उपग्रहावर राहण्यासंबंधीच्या तयारीस सुरुवात केली आहे.

उल्लेखनीय म्हणजे चिनी शास्त्रज्ञांनी चंद्रासारख्या वातावरणात राहण्यासंबंधीच्या चाचण्यांना सुरुवातही केली आहे. चंद्रासारख्या वातावरणाची निर्मिती करून तेथे ८ लोकांना वर्षभर ठेवण्यात येणार आहे.

वर्षभरात त्यांच्यावर नजर ठेऊन त्यांच्यावर चाचणी घेण्यात येईल. या चाचणीला चिनी शास्त्रज्ञांनी ‘युगोंग-३६५’ असे नाव दिले आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच या मिशनला प्रारंभ करण्यात आला.

चंद्रासारख्या वातावरणात पहिल्या टप्यात दोन महिला आणि दोन पुरुष हे ६० दिवस राहतील. त्यानंतर दोन महिला आणि दोन पुरुष अशा दुसर्या गटाला २०० दिवस या वातावरणात ठेवण्यात येईल. शेवटी पहिला गट पुन्हा एकदा १०५ दिवस अशा वातावरणात राहणार आहे.

चीननिर्मित चंद्रासारख्या वातावरणात ‘बायोरिजेनेटिव लाईङ्ग सपोर्ट सिस्टम’ (बीएलएसएस) च्या काम करण्याच्या पद्धतीचे निरीक्षण करण्याचा हा चीनचा दुसरा प्रयत्न आहे.

यापूर्वी १०५ दिवसांचे परीक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे. ‘बीएलएसएस’ ही एक अशी व्यवस्था आहे की, त्यामध्ये जीव, झाडे आणि सूक्ष्मजीव एकत्र राहतात.

अशा या व्यवस्थेत भोजन आणि पाण्याचे रिसायकलिंग करून पृथ्वीसारखे वातावरण तयार करता येऊ शकते.

LEAVE A REPLY

*