रेल्वेतून तोल जावून पडल्याने विद्यार्थी जखमी

0

जळगाव । दि. 6 । प्रतिनिधी-अमरावती एक्स्प्रेसमध्ये उलटी करण्यासाठी दरवाजात उभ्या अमळनेर तालुक्यातील तासखेडा येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा तोल जावून धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने हात कापल्याची घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाळधी स्थानकाजवळ घडली़ ड ोक्याला व तोंडावर मार लागल्याने तरुणाला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले

याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील तासखेडा येथील योगेश प्रकाश पाटील हा तरुण नूतन मराठा महाविद्यालयात तृतीय वर्ष विज्ञान शाखेला शिक्षण घेतो.

तो रोज अमळनेर येथून रेल्वेने ये-जा करत असतो़ आज कॉलेज आटोपून रेल्वे घरी तासखेडा येथे जाण्यासाठी निघाला़ जळगाव स्थानकावरुन तो अमरावती एक्स्प्रेसमध्ये बसला़ तेथून गाडी पाळधी स्थानकावर पोहचत असताना योगेशला चक्कर व मळमळ व्हायला लागली़ उलटी होईल म्हणून दरवाजात उभा राहिला़ उलटी करत असताना तोल गेल्याने तो खाली पडला़ यादरम्यान त्याचा डावा हात रेल्वेखाली आल्याने कापला गेला़ रेल्वे पोलिसांनी माहिती मिळताच तरुणाला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले़ व त्यांच्याकडील असलेल्या मोबाईलवरुन संपर्क साधत नातेवाईकांना माहिती दिली़ यानंतर तो तासखेडा असल्याची ओळख पटली़ नातेवाईकांनी त्याला जिल्हा रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात हलविले़ आहे.

LEAVE A REPLY

*