सई जोशीची भारतीय सॉफ्ट बॉल संघात निवड

0
जळगाव | प्रतिनिधी :  नोव्हेंबर २०१७ मध्ये तैवान येथे आशियाई महिला सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून भारतीय संघात जळगाव येथील मु.जे.महाविद्यालयाची खेळाडू कु.सई अनिल जोशी हिची निवड करण्यात आली आहे.

निवड झाल्याबद्दल जिल्हा क्रिडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, नगरसेविका श्रीमती उज्वला किरण बेंडाळे, डॉ.प्रविण अनाळकर, डॉ.राकेश मिश्रा, डॉ.शर्मा, डॉ.प्रदीप तळगावकर, डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर, प्रशांत जगताप यांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

दि.६ ते १५ ऑक्टोबर दरम्यान अनंतपुर (आंध्रप्रदेश) होणार्‍या ४थ्या सराव शिबीरासाठी ती रवाना झाली. तिच्या या स्तुत्य निवडीबद्दल ना.गिरीष महाजन, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे, पी.ई.पाटील, प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, सॉफ्ट खेळाडूंनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

*