पारोळा येथे घराचे छत कोसळ्याने चार जणांचा मृत्यू , एक बचावला 

0
योगेश पाटील | पारोळा :  शहरातील काझी मोहल्ला परिसरात आज पहाटे मातीच्या घराचे छत कोसळ्याने घरातील झोपलेल्या पाच जणापैकी चार जनांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला नागरिकांच्या सतर्कतेने वाचवण्यात यश आहे

 शहरातील मध्यभागी असलेल्या काझी मोहल्यातील  भिकन काझी यांच्या आनंदित परिवारात दी ६ रोजीची पहाट उजळलीच नाही  मात्र एकाच परिवारातील चार लोक गेल्याने परिसरात प्रचंड आक्रोश झाला असून दी ६  रोजी सकाळी सडेचार ते पाच वाजेच्या सुमारास भिकन काझी यांच्या चार रुमचे घर त्यात पुढील दोन  रूममध्ये कॉन्क्रीटच्या भिंतीबांधून वरती पत्रा टाकलेला होता .

मागील दोन रूम हे मातीचे बांधकाम होते त्यात भिकन यांची पत्नी साहेराबी भिकन काझी वय ५०, मोठा मुलगा हाशिम भिकन काझी वय २३, लहान मुलगा मोईन भिकन काझी वय १८, मुलगी शबीना भिकन काझी वय १७, (वरील सर्व मयत) मधला मुलगा वासिम भिकन काझी हे गार झोपेत असताना  सकाळी सडेचार ते पाच च्या सुमारास अचानक मातीच्या घराचे छत कोसळ्याने त्यात हे सर्व दबले गेले त्यात चार जनाचा मातीच्या ढिगारयाखाली दबून जागिच मृत्यू झाला आहे तर एक जणाला वाचवण्यात यश आले आहे
पलंगावर झोपल्याने वसिम बचावला
 वासिम हा परिवारासह एकाच खोलीत झोपला होता घरातील चार जण खाली झोपले होते तर वसिम हा पलंगावर झोपला होता त्यामुळे तो त्या  दुर्घटनेतून बचावला घराचे छत कोसळले त्यावेळी पलंगावरच असल्याने पलंगावरुन माती निसटली व बचावकार्य करणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लगेच लक्षात आल्याने त्यांस काढण्यात लवकर मदत झाली व तो बचावला मात्र त्यास छातीवर,तोंडावर,पोटावर  जबर मार लागल्याने जखमी झाला असून पारोळा कुटीर रुग्णालयात उपचार घेत आहे
    भिकन काझी यांचे वडिल व आत्या देखील घरातच होत्या ….
     भिकन काझी यांच्या आत्याआलिबु दर्शन पठान वय ८५ ह्या वयोवृद्ध असल्याने त्यांच्याकडेच राहत होत्या व भिकनचे वडिल नथ्थू गुलाब काझी वय ८० हे दोघे भाऊ बहिन वयोवृद्ध त्याच घरी होत्या परंतु ते पुढील रुममध्ये पत्र्याच्या छताखाली झोपले होते त्यामुळे ते बचावले व घराचे कोसळ्याचा आवाज आल्याचे समंजताच त्यांनी आरडाओरड केल्याने ही घटना   तात्काळ लक्षात आल्याने बचावकार्य जोमाने सुरू झाले
     भिकन नथ्थू काझी हे चादर पट्ट्या  व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेले होते  कुटुंब प्रमुख भिकन नथ्थू काझी हे चादर विकन्याचा व्यवसाय करत होते त्यानिमित्त ते काल गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथे गेले होते काल रात्री साडेआठच्या सुमारास आपल्या पत्नीशी फोनवर पारिवारिक चर्चा केली होती व त्यांनतर परिवारातील सर्व जण जेवण करुण रात्री साडेअकराच्या सुमारास झोपले होते. अंकलेश्वर येथून भिकन काझी आल्यावर त्यांनी प्रचंड प्रमाणात दुःख कोसळून हबरडा फोडला
     सुशिक्षीत परिवार घडवला होता
     भिकन काझी यांनी आपल्या छोट्याशा चादर विकन्याच्या व्यवसायवर मुलांना शिकवले होते मोठा मुलगा हाशिम शहादा जि धुळे येथे मॅकनिकल ईजीनियरची डीग्री घेऊन पास झाला होता मधला मुलगा वसिम हा मोटरमॅकनिक आय टी आय पास होऊंन धुळे येथिल एस टी महामडळात अप्रेडिसशिपचा जॉब करत आहे तर लहान मुलगा मोईन शहरातील भविष्य गारमेंट येथे कामाला होता मुलगी शबीना ही कासोदा येथिल उर्दू हायस्कुल येथे 12 वी ला शिक्षण घेत होती
घर कोसळल्यानतर मदत कार्य
हे घर कोसळल्यानतर परिसरात जोरात आवाज आल्याने ही परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती त्यात नसमुद्दीन काझी, शाहाउद्दीन काझी, नुरूद्दीन काझी, शेखलाल मिस्तरी, सिकंदर काझी, बद्रउद्दीन पिंजारी, फिरोज काझी, मोबिन काझी आदि गल्लीतिल नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले घटनास्थळी यावेळी पो नि एकनाथ पाडळे ,प्र तहसीलदार श्वेता संचेती ,उपनिरीक्षक अजितसिंग देवरे,हे कॉ बापू पाटील,मंडळ अधिकारी एस पी शिरसाठ शहर तलाठी पी एस बाविस्कर यांनी घटनास्थळी व रुग्णालयात जाऊन पंचनामा केला.
माजी नगरसेवक अजित मंसुरी,डाँ अमीन कुरेशी,माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे,जि प सदस्य रोहन पाटील,हिम्मत पाटील,काँग्रेसचे पिरण अनुष्ठान,नगरसेवक मनोज जगदाळे,नीतीन सोनार यासह सामाजिक कार्यकर्ते,समाज बांधव यांनी भेट देवून सांत्वन केले. प्रशासकीय दृष्ट्या पंचनामे झाले.
जखमी व मयतांवर प्रथमोपचार तसेच। शवविच्छेदन डाँ योगेश साळुंखे, डाँ धनंजय पाटील,डाँ सुनील पारोचे,प्रमोद सूर्यवंशी,दीपक सोनार,प्रसाद राजहंस,परिचारिका चारुशीला संघपाल,राजू वानखेडे यांनी केले.  दोन वर्षांपूर्वी ४ आगष्ट २०१५ मध्ये पारोळा शहरातील श्रीराम चौकातील भगवान मेखे यांचे मातीचे घराचे छत कोसळून त्यात भगवान मेखेसह पत्नी,२ मुले असे दबून मयत झाले होते.
त्यानंतर ही आजची घटना मण हेलावणारी असून अश्या घटना यापुढे घडू नयेत म्हणून न पा प्रशासनाने शहरात सारवे करून जीर्ण इमारती,घरे तपासणी करून त्यांना नोटिसा देवून त्या पडक्या व धोकेदायक इमारती,घरे पाडण्यास भाग पाडावे किंवा त्याठिकाणी रहिवास टाळावा आणि त्यांना शासनाच्या घरकुल योजनेत समाविष्ठ करून घेऊन त्याठिकाणी नवीन घर बांधनेस भाग पाडावे जेणे करून अश्या मण थक्क करणाऱ्या घटना रोखता येऊ शकतील.

LEAVE A REPLY

*