समाजकार्य पदविधारकांना न्याय द्या!

0
जळगाव |  प्रतिनिधी : आदिवासी विकास विभागाने ३१ जुलै रोजी अधिसुचना जारी करून बीएसडब्ल्यु व एमएसडब्ल्यु विद्यार्थ्यांवर एकप्रकारे मोठा अन्याय केला आहे. आदिवासी विभागातील वर्ग १ व वर्ग २ च्या पदाकरिता असलेलया सेवा प्रवेश नियम अचानकपणे मनमानी करून बदललेले आहे. या नियम बदलामुळे बीएसडब्ल्यु व एमएमडब्ल्यु च्या पदवीधारकांना एक प्रकारे डावलण्यात आले आहे. त्यामुळे समाजकार्य पदवीधारकांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी समाजकार्य महाविद्यालय माजी विद्यार्थी असोसिएशनच्यावतीने मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रामध्ये एकूण ५६ समाजकार्य महाविद्यालय असून त्यांना सामाजिक न्यायविभागाकडून अर्थसाहाय्य पुरविले जाते. या महाविद्यालयांमधून बाहेर पडणारे पदवीधारक हे अन्य पदवीधारकांपेक्षा समाजकार्यामधील ज्ञान व कौशल्य या महत्वपूर्ण बाबींनी समृध्द असतात.

सामाजिक समस्यांची जाणीव असलेला तसेच सामाजिक समस्यांचा डॉक्टर अशीच समाजकार्य शिक्षणपूर्ण केलेल्या पदवीधारकांची ओळख समाजाला आहे. समाजकार्य शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेले बीएसडब्ल्यु व एमएसडब्ल्यु उमेदवार सर्वच स्तरातील लोकांबरोबर कार्य करण्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे.शासनाच्या दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासासाठी राबविण्यात येणार्‍या वेगवेगळया प्रकल्पाच्या योजनांमध्ये अत्यंत महत्वाची भुमिका पार पाडणार्‍या बीएसडब्ल्यु व एमएसडब्ल्यु पदवीधारकांना डावलले जात आहे.

यामुळे विकास प्रक्रियेला गतीमान करण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्याऐवजी कुठल्याही शाखेचे पदवीधारकांची भरती करण्याचा आग्रह धरला जात असल्याने समाजकार्य पदवीधारकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजकार्य पदवीधारकांना न्याय देण्यासाठी समाजकार्य महाविद्यालय माजी विद्यार्थी असोसिएशनच्यावतीने मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

मोर्चात समाजकार्य महाविद्यालय अमळनेर, चोपडा, जळगाव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच संघर्ष कोअर समितीचे हेमंत कोळी, दिपक सपकाळे, भुषण लाडवंजारी, गायत्री पाटील, संदिप पाटील, वर्णा दळवी, ज्योती राऊत, विनोद पाटील, किरण माळी, अजिंक्य पवार, आदिती आंबिलवादे, शैलेंद्र सोनवणे, धीरज पाटील, प्रविण पाटील, चित्रा चव्हाण, भुषण साळुंखे, चैताली पाटील, योगेश नेरपगार, किरणकुमार पाटील, मोहिनी पाटील, शारदा सैंदाणे, सागर पावरा, धनजी राजपुत आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*