पंतप्रधान आवास योजनेचा १८ कोटीचा डीपीआर : प्रस्तााव शासनाकडे पाठवणार

0

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेअर्ंतगत पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी १८ कोटीचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. लवकरच हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. आतापर्यंत १२ हजार जणांची नोंदणी झाली आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येकांना घर असावं, या संकल्पनेतून केंद्र शासनातर्फे पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेतर्फे या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जागा देखील निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार मनपा प्रशासनाने १८ कोटीचा डीपीआर तयार केला आहे. योजनेबाबत दि.१३ रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर प्रशासनाने तयार केलेला १८ कोटीचा डीपीआर मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

१२ हजार जणांची नोंदणी

पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करण्याचे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आतापर्यंत १२ हजार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी दिली. चार जागांवर होणार योजना
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मेहरुण शिवार स.नं.४२५/अ/१ तांबापुरा येथील १ हेक्टर ३० आर, स.नं.४६५, ५६५ समतानगर येथील १० हेक्टर १७ आर, ५६ आर, पिंप्राळा शिवार गट नं.१७० खंडेरावनगरमधील ८ हेक्टर १३ आर आणि गट नं.१२० हरिवठ्ठलनगरमधील ५ हेक्टर झोपडपट्टीची शासकीय जागा जिल्हाधिकार्‍यांकडून मनपाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. या चारही जागा हस्तांतरीत करुन ७/१२ उतार्‍यावर महानगरपालिकेचे नाव लावण्यात येणार आहे.

जागा हस्तांतरीत करण्यासाठी प्रक्रिया

शहरातील तांबापुरा, समतानगर, खंडेरावनगर, हरिविठ्ठलनगर येथील झोपडपट्टीची शासकीय जागा महानगरपालिकेडे हस्तांतरीत झाली नसल्यामुळे तसेच या जागेच्या ७/१२ उतार्‍यावर महानगरपालिकेचे नाव नाही.

शासकीय असलेल्या चारही जागा मनपाकडे हस्तांतरीत करण्यासाठी १९९२ मध्ये जिल्हाधिकार्‍यांकडे आणि त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे जिल्हाधिकार्‍यांमार्फत २००१मध्ये पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु तेव्हापासून हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया रखडली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेकरीता झोपडपट्टी असलेल्या शासकीय जमिनी त्वरीत हस्तांतरण करण्यासाठी शासनाने महसूल विभागाला आदेश दिल्याने आवास योजनेसाठी जागा हस्तांतरीत करण्याकरीता मनपाकडून हालचाल सुरु झाली आहे.

LEAVE A REPLY

*