स्व.विद्याधर पानट हे सर्वांगिण व्यक्तिमत्त्वाचे मुर्तीमंत उदाहरण : श्रद्धांजली सभेत स्नेहीजनांची शब्दसुमनांजली

0
जळगाव |  प्रतिनिधी :  सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पत्रकारिता अशा सर्वच क्षेत्रात कर्तृत्ववान व्यक्तीमत्वाचे स्व.विद्याधर पानट हे मुर्तीमंत उदाहरण असल्याची शोकभावना उपस्थित स्नेहीजनांनी व्यक्त केली. यावेळी स्व.विद्याधर पानट यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

पानटसर स्नेहीजण यांच्यातर्फे मायादेवी नगरातील रोटरी भवनात ज्येष्ठ पत्रकार स्व.विद्याधर पानट यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी शोकभावना व्यक्त केल्या. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी शालिनता ही पानट सरांच्या व्यक्तीमत्वातून दिसत असल्याचे सांगितले.

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पानट सरांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असल्याची शोकभावना व्यक्त केली. दै.‘देशदूत’चे महाव्यवस्थापक विलास जैन, छायाचित्रकार पांडुरंग महाले यांनी स्व.पानट यांच्या आठवणींना उजाळा दिला. मानस कन्या रेखा चौधरी, निता झोपे यांनीही शब्दसुमनांजली वाहिली.

जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप तिवारी, राष्ट्रीय सेवा संघातर्फे विवेक जोशी, जैन उद्योगाचे अध्यक्ष अशोक जैन यांचा शोक संदेश मीडिया विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी यांनी वाचून दाखविला. तसेच दै.लोकमतचे संपादक मिलिंद कुलकर्णी, दै.पुढारीचे संपादक धों.ज. गुरव, दै.देशोन्नतीचे आवृत्ती प्रमुख मनोज बारी, दै.तरुणभारतचे निवासी संपादक चंदू नेवे, दै.लोकशाहीच्या संपादिका शांता वाणी, इकरा संस्थेचे अध्यक्ष करीम सालार, रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, साहित्यिक प्रियांका सोनी, भास्कर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. विजय डोहळे यांनी स्व.विद्याधर पानट यांच्या कार्याचा परिचय करुन दिला.

सूत्रसंचालन आशा फाउंडेशनचे संचालक गिरीश कुलकर्णी यांनी केले. यावेळी दै.‘देशदूत’चे संपादक हेमंत अलोने, जाहिरात व्यवस्थापक प्रदीप जाधव यांच्यासह जेष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील, गनी मेमन, फारुक शेख, दीपक चांदोरकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*