वाचन संस्कृती लोप पावत आहे – प्रा.डॉ.नीलम पाटील

0
चहार्डी, ता.चोपडा | वार्ताहर :  समाज सुशिक्षित व्हावा तो पुढे जायला पाहिजे या करिता आपल्या पूर्वजांनी वाचनालय काढली.परंतु आज विद्यार्थी व तरुणांचा वाचनाकडे ओढा कमी झाला असून, दुसरीकडे सोशल मीडियामुळे घराघरातील संवाद देखील कमी होत चालला आहे. याची दखल समाजाने घेणे जरुरीचे आहे.
वाचनाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. वाचनाने माणसाच्या ज्ञानात,आचरणात व संस्कृतीत भर पडून समाज संस्कारीत होतो. परंतु आज वाचन संस्कृती लोप पावत चालली असल्याची खंत जिल्हा परिषद सदस्या प्रा.डॉ.निलम पाटील यांनी व्यक्त केली.

चहार्डी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज शहर वाचनालय आयोजित नूतनीकरण वाचन हॉलच्या उदघाटन प्रसंगी प्रा.डॉ.निलम पाटील बोलत होत्या. अध्यक्षस्थानी व्ही.एन.पाटील सर होते.

कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक डॉ. सुरेश पाटील,जळगाव येथील जिजाई ङ्गाऊंडेशनचे प्रा.शा.ना.पाटील,पंचायत समिती सदस्या मालुबाई गोविंदा कोळी, उपसरपंच प्रशांत पाटील,भक्तीबोयोटेकचे सुभाष पाटील,अड. प्रकाश पाटील, डॉ. अशोक पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष प्रशांत सोनवणे, सचिव सुनील पाटील, संचालक उल्हास पाटील, एस.एस. कंखरे, एम. सी.पाटील, जी.टी.पाटील सर यांचेसह आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून हजर होते. यावेळी डॉ.सुरेश पाटील, एम.सी. पाटील, व्ही.एन. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी कै.भाऊराव माणिक पाटील, कै. रामराव पुनाजी पाटील कै.दत्तात्रय लकडू पाटील, कै.डॉ.विठ्ठलराव केशव पाटील यांच्या प्रतिमांचे वाचनालयात अनावरण करण्यात आले. यावेळी आशाताई डहाके जळगाव यांनी वाचानालयास पंचवीस हजार रुपयाची रोख देणगी दिली.

प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रशांत सोनवणे यांनी केले तर सुभाष बिर्‍हाडे यांनी सूत्रसंचलन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश पाटील, सहाय्यक ग्रंथपाल निंबा शेटे, संजीव शेटे, राजू शेटे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*