डॉ.बी.एस.पाटलांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईसाठी शिफारस करणार- उदय वाघ

0
अमळनेर, |  प्रतिनिधी :  पक्षातील अंतर्गत विषय वृत्तपत्राच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणणे हि भारतीय जनता पार्टीची पद्धत नसून माजी आ डॉ बी एस पाटील यांनी असे कृत्य केल्याने शिस्तीचा भंग त्यांनी केला आहे यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी यासाठी प्रदेश पातळीवर जिल्हाध्यक्ष या नात्याने शिफारस करणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी दिली.

यासंदर्भात उदय वाघ म्हणाले, की डॉ बी एस पाटील हे कॉंगेसमधून आल्याने तेथील पद्धतीनुसारच ते वागत असल्याचे दिसत आहे,परंतु भाजपा हा अत्यंत शिस्तीचा पक्ष असून येथे असले प्रकार चालू शकत नाही. त्यांना कोणाबद्दल तक्रार करायची होती तर पक्षाच्या व्यासपीठावर आपली भूमिका मांडायची होती.

परंतु त्यांनी तसे न करता वृत्तपत्रांद्वारे हा विषय चव्हाट्यावर आणून पक्षाची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे त्यांच्या बाबतीत पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजीचा सूर असून यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईसाठी शिफारस करणार असल्याची माहिती उदय वाघ यांनी दिली.

चार दिवसांपूर्वी भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी त्यांचे अधिकारात पक्षातील कार्यकारणीचा फेरबदल केला होता. त्यात जिल्हा कोषाध्यक्ष अमळनेरचे लालचंद सैनानी यांचे पद काढून घेतले तर शहराध्यक्षांची देखील नविन निवड करीत भाजपात प्रवेश घेणार्‍या नविन कार्यकर्त्यांची विविध समितींवर नियूक्ती केली होती.

या नियुक्त्या चूकीच्या असून कार्यकर्त्यांवर अन्याय असल्याचे माजी आ डॉ बी एस पाटील यांचेसह लालचंद सैनानी, सूभाष चौधरी, बजरंग अग्रवाल आदिंनी प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचेकडे लेखी तक्रार केली त्यावरून प्रदेशाध्यक्षांनी या नियूक्ती रद्द केल्या होत्या. यावरून डॉ पाटील यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*