Blog ## अमळनेर भाजपात घरका भेदी लंका ढाये!

0
अमळनेर| राजेंद्र पोतदार :   भाजपा जिल्ह्यासह सर्वत्र फोफावत असतांना दोन्ही कॉंग्रेसचे नेते पदाधिकारी प्रवेशाच्या प्रतिक्षेत असतांना जिल्हाध्यक्ष उदय वाघ व माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ बी एस पाटील यांचेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने अमळनेर भाजपात मात्र पून्हा एकदा गट-तट निर्माण झाले आहेत. त्यामूळे सामान्य कार्यकर्ते अडचणीत आले आहेत.

विधानसभा निवडणूकीत चौथ्यांदा उमेदवारी पक्षाकडून न मिळाल्याने भाजपा नेते नाथाभाऊंनी जिल्ह्यातील मराठा नेत्यांना संपविण्याचा विडा उचलेला आहे, अशा कडक शब्दात टिका करणारे व सतत १५ वर्ष आमदार असतांना कधीही नाथाभाऊंना नेता न मानणारे माजी आमदार डॉ बी एस पाटील हे आता काही दिवसांपासून भाऊंच्या खास समर्थकांमध्ये समजले जात असून जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी परवा जिल्हा कार्यकारणीत काही पदाधिकार्‍यांचा फेरबदल करित नविन विविध समिती अध्यक्षांच्या निवडी घोषीत केल्या.

त्यावर डॉ बी एस पाटील यांनी प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवेंना लेखी तक्रार करीत जिल्हाध्यक्षांविरूध्द एल्गार पूकारला. यावरून आता भाजपात पून्हा एकदा दोन तट निर्माण झाले आहेत. उदय वाघ यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर केला असला तरी प्रोटोकॉल नूसार या निवडीची प्रदेश अध्यक्ष यांची मान्यता मिळाल्यानंतर प्रसार माध्यमांना द्यायला हवी होती.

डॉ पाटील यांचेसह काही स्थानीक पदाधिकार्‍यांनी तक्रारी केल्या व त्वरीत प्रदेश अध्यक्षांनी या नियूक्त्या रद्द केल्या. यावरून वाघांचे देखील यात चूक आहे, हे त्यांचेच काही कार्यकर्ते खाजगीत कबूल करतात. गेल्या अनेक दिवसांपासून वरवर आलबेल दिसत असले तरी आतून मोठ्या प्रमाणात गटबाजी अमळनेरात नव्हे तर जिल्ह्यात सूरू आहे. जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे होमटाऊन अमळनेर असल्याने या ठिकाणी अनेक बाबींच्या घडामोडी दिसून येतात.

नाथाभाऊंच्या वाढदिवसाला व २५ वर्ष पक्षात काम करणार्‍या कार्यकर्त्यांचा सत्कार कार्यक्रमाला जिल्हाध्यक्षांची अनुपस्थिती होती. यावरूनच दोघांमधील सुंदोपसंदी दिसून आली. मूळात तो कार्यक्रम पक्षाच्या प्रोटोकॉल नूसार जिल्हाध्यक्ष किंवा तालूकाध्यक्ष आयोजक हवे होते.

मात्र सर्व कार्यक्रम डॉ पाटील यांनीच हॅक केला. म्हणूनच वाघांनी उपस्थीत राहाण्याचे टाळले. त्यात कार्यकर्तेंचा सन्मान झाल्याने वाघांनी विरोध केला नाही मात्र खरी ठिणगी येथूनच पडली. त्यात राकॉच्या एका नेत्याला पक्षात घेण्यासाठी वाघांचा हिरवा कंदिल होता, मात्र त्यांना घेण्यावरून डॉ पाटलांचा विरोध होता.

यासह माजी नगराध्यक्ष सूभाष चौधरी यांचेकडे द्वार दर्शनाला नाथाभाऊ आले असतांना पत्रकारांशी वार्तालाप करतांना त्यांनी काही राजकीय पदाधिकारी अवैध व्यवसाईक व अधिकार्‍यांच्या बदलीसाठी लाखो रुपये घेतात, असे सांगतांना त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, मात्र पून्हा दूसर्‍यांदा याच विषयावर त्यांना बोलते केले असता यावर लालूशेठ सविस्तर सांगू शकतील, कूठे गेले ते? म्हणत स्वतः आ. खडसेंनी सरळ कोणावर वार केला, त्यांचे नावाचा उदय मात्र उपस्थीत कार्यकर्त्यांनी केला व थोड्या वेळातच आ.सौ. वाघ त्याठिकाणी आल्या.

त्यांनी पत्रकारांना घरका भेदी लंका ढाये एव्हढेच सूचक विधान केले. यावरून या ठिकाणी घडलेल्या चर्चात्मक घडामोडी काहींनी मोबाईलवर कॅच करीत वाघांना एैकविल्या. त्यामूळे हा फेरबदल केला गेला, हे कटूसत्य कोणीच नाकारणार नाही.

आता या सर्व घडामोडीत शिस्त भंग म्हणा कि वादाची सूरूवात कोणी व का केली? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहातो वादाची सूरूवात कूठून झाली यापेक्षा का झाली यात कोणाचे हित आहे, कोण दोषी वैगेरे या चर्चा या रंगू लागल्या असल्या यात सामान्य कार्यकर्ता पक्षाचा झेंडा हातात घेवून कोणाचे समर्थन करू, यात अडकला आहे. डॉ बी एस पाटील १५ वर्ष आमदार असतांना उदय वाघ व अनिल पाटील यांचेतील अंतर्गत गटबाजीने हैराण होते.

त्यांना वाघांनी निलंबीत केले. अनिल पाटील राष्ट्रवादीत गेले तेव्हा आता गटबाजी थांबली असे वाटत असतांना पून्हा आबा-बापू या नेत्यांचा वाद चव्हाट्यावर आला आणी कार्यकर्ते पून्हा संभ्रमात पडले आहेत. केंद्र व राज्यासह सर्वत्र सत्ता मिळाली असतांना सतत आंदोलने करून केसेसला सामोरे जाणारे कार्यकर्त्यांनी आता सूटकेचा निश्वास सोडून सत्तेची ऊब राखतांना नेत्यांची गटबाजीने मात्र त्रासले आहेत.

LEAVE A REPLY

*