ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर.आर.शाळेवर दोन वर्षासाठी प्रशासक

0
जळगाव | प्रतिनिधी :  ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर.आर विद्यालयातील मुख्याध्यापकांसह ६८ शिक्षकांनी संस्थाचालकांविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीबाबात शिक्षणाधिकार्‍यांसह प्रांत अधिकार्‍यांनी तक्रारदार मुख्याध्यापकांसह शिक्षकांची जबाब घेवून चौकशी करून शिक्षण विभागाकडे अहवाल सादर केला होता.
याप्रकरणी संस्थाचालक यांना देखील म्हणणे सादर करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुषंगाने शिक्षण संचालनालयाने याबाबत निर्णय देवून आर.आर शाळेवर दोन वर्षासाठी प्रशासकाची नेमणूक करण्याचे आदेश आज जारी केले.

ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब रुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकांसह ६८ शिक्षकांनी काही महिन्यांपूर्वी संस्थाचालकांकडून मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार केली होती. यानंतर शिक्षकांनी पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील, आ. स्मिता वाघ, शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांना निवेदन देखील दिले होते. तर काही दिवसांपूर्वी शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांसह प्रांतधिकार्‍यांनी चौकशी देखील केली होती.

यानंतर शाळेबाबत प्राप्त तक्रारीनुसार विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी चौकशी करुन अहवाल शासनास सादर केला होता. यानुसार आज शिक्षक संचालक गंगाधर तामणे यांनी दोन वर्षासाठी संस्थेवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले आहे.

दरम्यान महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम १९७६ मधील कलम ३ (४) च्या तरतूदीनुसार या आदेशाविरुध्द संस्थाचालकाला राज्यशासनाकडे अपिल करता येणार आहे.

LEAVE A REPLY

*