भाववाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा मोर्चा : महिला पदधिकार्‍यांनी काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा

0
जळगाव |  प्रतिनिधी :  कर्जमाफी व जीवनावश्यक वस्तुच्या भाववाढीच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात आला. तसेच मागण्याबाबत जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

शेतकरी कर्जमाफी, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व विविध वस्तुच्या महागाई विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. सतिष पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

राष्ट्रवादी कार्यालयापासून या जनआक्रोश मोर्चाला सुरवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी प्रतिकात्मक प्रेतयात्रा होती. तसेच बैलगाडीवर शेतकरी आत्महत्येची प्रतिकृती साकारण्यात आली होती.

मोर्चे वेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी. खा. वसंत मोरे, माजी आ. दिलीप वाघ, राजीव देशमुख, रविंद्र पाटील, गफ्फार मलिक, जिल्हा उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हा समन्वय विकास पवार,जि.प सदस्य शशिकांत सांळुखे, रविंद्र पाटील, महानगराध्यक्ष निलेश पाटील, संजय गरुड,सचिन पाटील, कल्पना पाटील, मिनल पाटील, मंगला पाटील,जि.प सदस्या जयश्री पाटील, डॉ.निलम पाटील, विजया पाटील,सविता बोरसे, नगरसेवक प्रतिभा शिरसाठ, लता मोरे, निला चौधरी, कल्पिता पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी किशोराजे निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

*