गोलाणी व्यापारी संकुला पाठोपाठ सहा व्यापारी संकुलाचे ठराव विखंडणासाठी पाठविण्याचे संकेत

0
जळगाव |  प्रतिनिधी :  गोलाणी व्यापारी संकुला पाठोपाठ पुन्हा सहा व्यापारी संकुलाचे ठराव विखंडणासाठी शासनाकडे पाठण्याचे हालचाल सुुरु झाली आहे. त्यामुळे गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

तत्कालीन जळगाव नगरपालिकेने व्यापारी संकुलातील गाळे देण्यासाठी करार करण्यात आले आहे. नगरपालिका अधिनियम १९६५ कलम ९२ नुसार प्रत्येक तीन-तीन वर्षांनी मुदत वाढ देवून नऊ वर्षासाठी करार करण्याची तरतुद आहे.

परंतु तत्कालीन जळगाव नगरपालिकेने काही व्यापारी संकुलातील गाळ्यांचे २० वर्ष, ५० वर्ष, ३० वर्ष पर्यंत गाळे कराराने देण्यासाठी ठराव करण्यात आले आहे. मनपा मालकीच्या २८ व्यापारी संकुलांपैकी १८ व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत सन २०१२ मध्ये संपुष्टात आली आहे.

प्रशासनाने गोलाणी व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या कराराबाबतचे ठराव विखंडणासाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्या पाठोपाठ पुन्हा सहा व्यापारी संकुलातीचे ठराव देखील शासनाकडे विखंडणासाठी पाठविण्याची हालचाल सुरु झाली आहे. त्यासाठी विधी सल्लागारांकडून अभिप्राय देखील मागविण्यात आला असल्याचे समजते.

सोमाणी व्यापारी संकुलची २०१८ पर्यंत मुदत

पिंप्राळ्यातील सोमाणी व्यापारी संकुलातील गाळ्यांचे करार २० वर्षासाठी करण्यात आले आहे. यातील गाळ्यांच्या कराराची मुदत २०१८ मध्ये संपुष्टात येणार आहे.

असे आहेत सहा व्यापारी संकुल

न्यु बी.जे.व्यापारी संकुल, सोमाणी व्यापारी संकुल, मिनाताई ठाकरे व्यापारी संकुल, सावखेडा व्यापारी संकुल, शिवाजीनगर व्यापारी संकुल आणि आंबेडकर व्यापारी संकुलातील एक हॉल अशा एकूण सहा व्यापारी संकुलामध्ये जवळपास १२०० आहेत. गोलाणी व्यापारी संकुला पाठोपाठ आता पुन्हा सहा व्यापारी संकुलाचे ठराव विखंडणासाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*