जळगावला विश्वमंगल योग व नँचरोपॅथी सेंटरतर्फे 52 योग शिक्षकांचा गौरव

0

जळगाव । दि.6 । प्रतिनिधी : येथील विश्वमंगल योग व नँचरोपँथी सेंटरतर्फे शिक्षक दिनानिमित्ताने योग शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी निलांबरी जावळे मॅडम होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून योग शिक्षिका हेमांगीनी सोनवणे, संध्या सूर्यवंशी , डॉ. भावना चौधरी, चित्रा महाजन, कल्पना बोरोले या उपस्थित होत्या.

शहरात विविध भागात योगाचा प्रसार करणार्‍या मृदुला कुळकर्णी , अर्चना गुरव , नेहा तळेले , रक्षदा ठाकूर, कल्पना भावसार अश्या एकूण 52 योग शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .केंद्र संचालिका चित्रा महाजन यांनी रुपाली ठाकुर यांची पीएचडीसाठी निवड झाल्या बद्दल सत्कार करून त्यांच्या पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मनशक्तीच्या साधक कल्पना बोरोले यांनी ध्याना चे महत्त्व सांगुन उपस्थित असलेल्या सर्व योग शिक्षक आणि योग साधक यांच्याकडुन ध्यानाचे प्रात्यक्षिक करून घेतले.ओंकार पार्थना सीमा पाटील यांनी केली. आभार प्रदर्शन केंद्र संचालिका चित्रा महाजन यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली ठाकूर यांनी केले.कार्यक्रमासाठी कविता चौधरी, रोहिणी पाचपांडे,नीलिमा लोखंडे यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

*