एरंडोल येथे चिमुकल्यांसह मातेची विहिरीत उडी

0

एरंडोल । दि.5 । श.प्र.-पती दररोज दारू पिऊन मारहाण करतो. सासू, सासरे व दीर मारहाण करून शिविगाळ करतात, या दररोजच्या जाचाला कंटाळून एका विवाहीतेने आपल्या दोन चिमुरड्यांना सोबत घेऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

शीतल नरेंद्र महाजन(27)असे विवाहीतेचे नाव आहे. तिने मुलगा तेजस (वय 7) व मुलगी साधना (14 महिने)या दोघांना शेतात नेले. शेतातील विहिरीत आधी दोन्ही मुलांना ढकलले व नंतर स्वत: उडी घेऊन आत्महत्या केली.

बुधवारी मध्यरात्रीपासून शीतल महाजन दोन्ही मुलांसह बेपत्ता होती. तिच्या सासर आणि माहेरचे लोक तिचा शोध घेत होते.

 

शीतलने मुलांसह आत्महत्या केली की, तिला विहिरीत ढकलून त्यांची हत्या करण्यात आली.हे अद्याप समजू शकले नाही. शीतलच्या माहेरच्या लोकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

घटनेची वार्ता पसरताच एरंडोलसह तळई येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून प्रेत काढणेसाठी माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन, नगरसेवक कुणाल महाजन, योगेश महाजन, अतुल महाजन, माजी नगरसेवक संजय चौधरी, संजय महाजन, माजी सभापती दिलीप रोकडे, रमाकांत महाजन यांच्यासह युवकांनी सहकार्य केले.

जळगाव येथून शवविच्छेदन करुन प्रेत सरळ एरंडोल पोलिस स्टेशनला आणले. येथे मृताच्या नातेवाईकांसह 40 ते 50 जणांनी माहिलांसह ठिय्या आंदोल केले.

संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याबाबत कामकाज सुरु होते. पुढील तपास पी.एस.आय.बैसाणे करीत आहे.

LEAVE A REPLY

*