उत्तम वक्ता होण्यासाठी आत्मविश्‍वास, ज्ञान, सराव आवश्यक – शंभू पाटील

0
जळगाव | प्रतिनिधी : आत्मविश्‍वास, ज्ञान आणि सराव ही उत्तम वक्ता होण्याची त्रिसुत्री असुन जगातील सर्वच महान नेत्यांना अमोघ वक्वृत्वाची देणगी लाभली होती. वक्वृत्व कलेमुळे हजारों, कोटी लोंकावर राय करता येऊ शकते. उत्तम वक्ता असलेली व्यक्ती ही चौकस, सद्सदविवेकबुध्दीची देणगी लाभलेली असते असे प्रतिपादन प्रसिध्द नाटय कलावंत शंभु पाटील यांनी केले.

धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी संचलित, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय आणि विद्यार्थी विकास विभाग उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय भाषण कौशल्य कार्यशाळेची आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन नाटय कलावंत शंभु पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी समाजकार्य महाविद्यालयाच्या ‘जागर’ या नियतकालीकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फैजपूर येथील धनाजी नाान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी होते. याप्रसंगी प्रा.जी.ए.उस्मानी, उमविच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा.एस.टी.इंगळे, जिल्हा समन्वयक प्रा.नितीन बडगुजर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रा.डॉ.पी.आर.चौधरी यांनी अध्यक्षीय भाषण करतांना विद्यार्थ्यांसाठी वक्वृत्व ही व्यक्तीमत्व विकासाची संधी आहे कारण वक्वृत्व करतांना समाजात घडणा-या विविध घडामोडीची जाणीव असणे नियमित वाचन असणे आवश्यक असते. नियमित वाचनाने व्यक्तीमत्व प्रगल्भ होते.

प्रा.जी.ए.उस्मानी कार्यशाळेचे बीजभाषण करतांना वक्वृत्वाचे विविध पैलु स्पष्ट केले. वक्वृत्व ही एक कला असुन त्यासाठी अथक प्रयत्न करणे आवश्यक असते. वक्वृत्व करतांना श्रोते कोण आहेत, वक्वृत्वाचा विषय काय आहे, कार्यक्रमाच्या ठिकाणाचे वातावरण काय आहे तसेच श्रोत्यांची मानसिकता काय आहे इत्यादी गोष्टी ओळखुन वक्वृत्वाची गुंफण केली पाहिजे, असे मार्गदर्शन केले.

प्रा.सुनिल नेवे यांनी भाषण कौशल्य व प्रकार या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना श्रोता आणि वक्ता यांच्यात वैचारीक संबंध कसा प्रस्तापित करावा याविषयी मार्गदर्शन केले. प्रा.अरविंद चौधरी यांनी प्रकट मुलाखतीचे तंत्र विद्यार्थ्यांना समजावुन सांगण्यासाठी मॉक इंटरव्हयु घेतला.

या दोन दिवशीय कार्यशाळेचा समारोप उद्या दि.५ रोजी होणार आहे. समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजकार्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.उमेश वाणी असतील. तसेच प्रा.अतुल बारेकर, प्रा.जुगलकिशोर दुबे, प्रा.नितीन बडगुजर समारोपीय कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. या कार्यशाळेत जळगांव, नंदुरबार व धुळे या जिल्हयातील २० विविध महाविद्यालयातील १४० विद्यार्थ्यांनी उपस्थित आहेत.

LEAVE A REPLY

*