कॅशलेस व्यवहारात जिल्हा बँक दोन राज्यात अव्वल

0
जळगाव |  प्रतिनिधी :  अवघ्या सहा महिन्यात साडेसहा लाख आर्थिक व्यवहार हे कॅशलेस पध्दतीने केल्याने महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही प्रथम क्रमांकाची ठरली असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड.रोहिणी खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा बँकेत झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्षा ऍड.रोहीणी खडसे यांनी सांगितले की, जिल्हा बँकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर कॅशलेस व्यवहाराला चालना दिली. त्यासाठी १ लाख क्रेडीट व डेबीट कार्ड वाटप करण्यात आले.

नोटबंदी काळात सर्व बँकांमध्ये रोकड रकमेचा तुटवडा असतांनाही या कार्डामुळे जिल्हा बँकेच्या शेतकरी व खातेदारांना रोख रक्कम मिळू शकली. अवघ्या सहा महिन्यात साडेसहा लाख व्यवहार कॅशलेस पध्दतीने झाले आहेत. त्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेने महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातून जळगाव जिल्हा मध्यर्वी सहकारी बँकेला प्रथम क्रमांक मिळाल्याचा सन्मान केला असल्याचे ऍड.रोहिणी खडसे यांनी सांगितले.

बंकेचे ज्येष्ठ संचालक आ.एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ, शेतकरी, सभासद व कर्मचार्‍यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत व्हाईस चेअरमन आ.किशोर पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*