भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केलेल्या नियुक्त्या प्रदेश भाजपाकडून रद्द

0
जळगाव |  प्रतिनिधी :  भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी विविध आघाड्यांची पुनर्रचना करीत केलेल्या सर्व नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आल्या असल्याचे भाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकूंद कुळकर्णी यांनी कळविले आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा भाजपात विविध आघाड्या, मंडल यांची पुनर्रचना करण्यात आली. जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी ही पुनर्रचना करुन महिला मोर्चा, अनुसूचित जाती आघाडी, किसान मोर्चा, उद्योग आघाडी, शिक्षक आघाडी, मच्छीमार आघाडी, नमामी गंगे, सहकार आघाडी, तालुका मंडल, जिल्हा कार्यकारीणी यावर कार्यकर्त्यांची नियुक्ती केली होती.

दरम्यान जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केलेल्या सर्व नियुक्त्या या प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आल्या असल्यचे भाजपा कार्यालयाचे प्रदेश सचिव मुकूंद कुळकर्णी यांनी कळविले आहे.

तसेच प्रदेशाध्यक्षांचे आदेश होईपर्यंत नियुक्त्यांच्या या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली असल्याचे प्रदेश भाजपाने कळविले आहे. प्रदेश भाजपाकडून या नियुक्त्या रद्द झाल्याने उदय वाघ यांना पक्षाने जोरदार झटका दिला आहे.

नगरपालिका व जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले त्यांच्याऐवजी नव्या दमाच्या व प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी देण्याचा मी प्रयत्न केला. पक्षात जे निर्णय होतात ते सामुहिकपणे होतात. मी माझ्या अध्यक्षपदाच्या अधिकाराचा वापर केला आहे. नियुक्त्या रद्द संदर्भात प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार असून त्यांच्याकडे भूमिका मांडणार आहेत. ते माझ्या मताशी नक्कीच सहमत होतील.
– उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजपा

LEAVE A REPLY

*