उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलसचिवपदी बी.बी.पाटील

0
जळगाव दि. 4 (   ) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलसचिवपदी बी.बी.पाटील यांची निवड करण्यात आली असून उद्या दि.5 ऑक्टोबर रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत. श्री.पाटील हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उपकुलसचिव (प्रशासन) पदी कार्यरत आहेत.
  बुधवार, दि.4 ऑक्टोबर रोजी कुलसचिवपदासाठी मुलाखती  झाल्या. दहा उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित होते. मुलाखतीनंतर श्री.बी.बी.पाटील यांची कुलसचिवपदी निवड करण्यात आली. एम.एस्सी.(गणित) पर्यंत  शिक्षण झालेल्या श्री.पाटील यांना कुलसचिवपदाचाही अनुभव असून 8 मे, 2013 ते 29 मार्च, 2017 या कालावधीत  नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात त्यांनी कुलसचिव म्हणून काम केले आहे.
श्री.पाटील यांना शिक्षकपदाचा सहा वर्षाचा तर प्रशासनाचा 24 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उपकुलसचिव (प्रशासन) पदावर कार्यरत आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डिसेंबर, 1993 मध्ये त्यांची सहायक कुलसचिवपदी निवड झाली. त्यानंतर 2008 मध्ये ते उपकुलसचिव झाले.
शासनाच्या विविध समित्यांमध्ये त्यांनी काम केलेले असून समान परिनियम समिती, विद्यापीठ – महाविद्यालये अधिकारी व कर्मचारी भरती नियम आणि पात्रता समिती या सारख्या विविध समित्यांमध्ये त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे.
नांदेड विद्यापीठाच्या न्ॉक सुकाणू समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध पदावर काम करताना त्यांनी संलग्नित महाविद्यालयांसाठी न्ॉक अॅक्रीडेशन, ऑनलाईन संलग्नता, परीक्षेतील बारकोड पध्दत यासाठी कार्यशाळांचे आयोजन केलेले आहे.
विद्यापीठाच्या वतीने घेतल्या जाणाज्या महत्वाच्या कार्यक्रमांमध्येही त्यांचा सहभाग राहिलेला आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केंद्रीय मूल्यांकन कार्यक्रम उत्तमरित्या राबविल्याबद्दल, प्रशासन विभागात उत्तम काम केल्याबद्दल आणि न्ॉक मूल्यांकनाच्या दुसज्या साखळीसाठी चांगले काम केल्याबद्दल तत्कालीन कुलगुरुंनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
  उद्या 5 ऑक्टोबर रोजी प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांच्याकडून श्री.बी.बी.पाटील हे कुलसचिवपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

LEAVE A REPLY

*