चोपड्यात भारनियमनचा पाणी पुरवठ्यात खोडा, नागरिक त्रस्त,अधिकारी हतबल,महिलांनी घातला घेराव 

0
चोपडा – शहरात बाजार पेठेच्या पाचव्या झोनला पाणी पुरवठा करण्यासाठी पिण्याचे पाणी सोडण्यात आले.अन् वीज वितरण कंपनीने भारनियमन करण्याचे उद्योग केल्याने नागरिक त्रस्त होवून ताटकळत राहिले.
 तर वरुन भारनियमन झाल्याचे सांगत हतबल दिसून आले.दरम्यान बुधवारी महिलांनी सुतगिरणीच्या संचालिका रंजना नेवे यांच्या नेतृत्वाखाली पालिका कार्यालयात पाणी पुरवठा व रस्त्यासाठी अधिका-यांना घेराव घातला.
शहरातील बाजार पेठ व मेनरोडला पिण्याचे पाणी सहाव्या दिवशी आज दि.३ रोजी रात्री साडेसात वाजता आले.नेमक्य त्याचवेळी वीज मंडळाने घात केला.आझाद चौक भागात भारनियमन केले.त्यामुळे गुरव गल्ली,दर्गा अळी,मेनरोड,देशपांडे गल्ली,आझाद चौक,गुजरअळी या भागात वीज गायब झाली.
सहा दिवसांनी पाणी पुरवठा होत असतांना नगर पालिका व वीज वितरण कंपनी यांचे बेदरकार कारभाराचा फटका जनतेला सहन करावा लागला आहे.कोणत्याही प्रकारची पूर्व सुचना न देता वीज वितरण कंपनी भारनियमन कशी करते?पालिका व वीज कंपनीत संवाद नाही का? अशी चर्चा विशेष करुन महिलांमध्ये होताना दिसत होती. नेमके पिण्याच्या पाण्याच्या वेळीच होणारे भारनियमन बंद न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
याप्रकरणी वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी सोनवणे,कनिष्ठ अभियंता महाजन यांच्याशी संपर्क करुन ‘ऎनवेळी’ भारनियमन थांबविण्याची मागणी केली.त्यांनी वरिष्ठांना कळवितो. नगर परिषदेला पत्र देतो असे सांगितले. पण सहा दिवसाने झालेला पाणी पुरवठा विजे अभावी नागरिकांना भरता आला नाही.त्यामुळे जनतेत संताप व्यक्त होत होता.
रस्त्याची मागणी
मेनरोड ते शनिमंदिरकडे जाणारा रस्ता देशपांडे गल्लीतून जातो.त्याच्यावर खुप मोठी वाहतूक असते.मात्र रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे.पालिकेने हा रस्ता करण्यासाठी अनेकवेळा मोजला पण प्रत्यक्ष काम होत नसल्यामुळे रहिवाश्यात प्रचंड नाराजी आहे.रस्ता खराब असल्याने अनेक अपघात होतात. पण पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला.
यावेळी दिपाली शर्मा,खैरुन्नीसा अ.हमिद,फरिदाबी अब्दुल्ला, आशाबाई चौधरी,कलावती शिरसाठ,उषाबाई पेंढारकर, पुष्पाबाइ पाटील,मेघा नेवे,सुशीला चौधरी,मोहिनी नेवे,वनिता पाटील, आशाबाई पाटील,कविता पाटील, भावना चौधरी,अनामिका जैन,वैशाली राजपुत, भारती नेवे,लीलाबाई चित्रकथी,सुनंदाबाई ठाकूर,प्रतिभा नेवे,आशाबाई शर्मा,फैबुन्नीसा शेख,जायदाबी जयाउद्दीन,कमलबाई पाटील  आदि उपस्थित होत्या.
तसेच वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी सोनवणे यांना निवेदन देवून बेसुमार होणारे भारनियमन बंद करावे.पाणीपुरवठा व भारनियमन यांच्या वेळांचे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

*