‘नारी सन्मान संगठन’ पुरस्काराने जळगावच्या पाच महिलांचा गौरव

0
जळगाव |  प्रतिनिधी :  नाशिक येथे झालेल्या नारी सन्मान संगठन पुरस्कार वाटपाप्रसंगी जळगावातील पाच महिलांचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन, गृहमंत्री डॉ.रणजीत पाटील, नाशिक उपमहापौर प्रथमेश गिते, सभापती उद्धवबाबा निमसे, आ.बाबासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे, ओबीसी जनक्रांतीचे अनिल महाजन, मुंबईच्या नारी सन्मान संगठन अध्यक्षा सुंदरी ठाकुर, मनोरमा पाटील उपस्थित होते.

या मान्यवरांच्या हस्ते जळगावमधील सामाजिक व महिला कल्याण विकास क्षेत्रात विशेष योगदान व उल्लेखनिय कार्य करणार्‍या सरिता नेरकर, मंगला बारी, वंदना पाटील, पूनम खैरनार, छाया पाटील यांना नारी सन्मान संगठन पुरस्काराने गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

*