पद्मश्री महानोर यांच्यासह राजवाडे मंडळाला ‘पुरुषोत्तम’ पुरस्कार : पी.के.अण्णा फाऊंडेशनचा उपक्रम

0
नरेंद्र बागले | शहादा :   पुज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळ व पी.के. अण्णा पाटील फाऊंडेशन शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.९ ऑक्टोंबर रोजी विचारमंथन किसान दिन व पुरूषोत्तम पारितोषिक प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

यावर्षी व्यक्तीस्तरावर माजी विधान परिषद सदस्य तथा कवी ना.धो. महानोर यांना तर संस्था स्तरावर इतिहासाचार्य वि.का.राजवाडे इतिहास संशोधन मंडळ धुळे यांना पुरूषोत्तम पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

येथील कै.पी.के.अण्णा पाटील यांचा जयंती दिन विचारमंथन किसान दिन म्हणून साजरा केला जातो. जयंती दिनाचे औचित्य साधून सामााजिक, शैक्षणिक संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी व्यक्ती व संस्थेस प्रतिवर्षी पुरूषोत्तम पुरस्काराने गौरविण्यात येते. पी.के.अणा पाटील फाऊंडेशनतर्फे सन २००३ पासून पुरस्कार देण्यात येत असून पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये व मानचिन्ह असे आहे.

दि.९ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९.३० वाजता संस्थेच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दिपक पाटील राहतील. पुरस्कार सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.

तत्पुर्वी पुरूषार्थ जीवन दर्शन भवनाचे उद्घाटन अखिल भारतीय गुर्जर महासभा दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. रामसरण भाटी यांच्या हस्ते तर महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन हारदा (मध्यप्रदेश) चे आ.डॉ. रामकृष्ण दोणगेजी यांच्या हस्ते होईल.

यावेळी अभा गुर्जर महासभेचे जनरल सेक्रेटरी डॉ. जिलेसिंग कपासिया, दिल्ली प्रदेश गुर्जर महासभेचे अध्यक्ष इंद्रराजसिंग चौधरी, माजी युवक कल्याण व क्रीडामंत्री ऍड.पद्माकर वळवी, आ.उदेसिंग पाडवी, आ.चंद्रकांत रघुवंशी, हिरा उद्योग समृहाचे संस्थापक हिरालाल चौधरी, आ. शिरीष चौधरी, जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, उपाध्यक्ष सुहास नाईक, भाजपा ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, उपनगराध्यक्ष रेखाबाई चौधरी, पं.स. सभापती दरबारसिंग पवार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, लोकनायक जयप्रकाश सुतगिरणीचे उपाध्यक्ष रोेहिदास मक्कन पाटील, कृउबास सभापती सुनिल पाटील, तालुका दुध उत्पादक संघाचे चेअरमन रविंद्रसिंग राऊळ, सातपुडा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रेमसिंग अहरे, मंडळाच्या मानद सचिव कमलताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील.

कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन पी.के. अण्णा पाटील फाऊंडेशनचे सचिव प्राचार्य मकरंद पाटील व पुज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष किशोर नरोत्तम पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, यावर्षी व्यक्तीस्तरावरील पुरूषोत्तम पुरस्कारासाठी शेती व साहित्य विषयाद्वारे रानकवी म्हणून नावलौकीक असलेले पद्मश्री ना.धो. महानोर यांची निवड करण्यात आली आहे. श्री.महानोर यांचा जन्म शेतकरी कुटूंबात पळासखेडे पो.फर्दापूर जि. औरंगाबाद येथे झाला असून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून ते दोनवेळा विधान परिषद सदस्य राहिले आहेत.

नवनवीन कृषी प्रयोग स्वतः राबवून शेती व पाण्याच्या बाबतीत आदर्श निर्माण करणार्‍या महानोर यांचे कला साहित्य क्षेत्रात विशेष योगदान आहे. त्यांच्या सुमारे ३५० कविता, ५३ चित्रपट गीते, ८ व्यक्तीचित्रणे आणि शेती पाणी विषयावर अनेक लेख प्रकाशित झाले आहेत.

संस्था स्तरावर यावर्षी पुरूषोत्तम पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या इतिहासाचार्य वि.का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळ धुळे या संस्थेची स्थापना ९ जानेवारी १९२७ ला झाली आहे. इतिहास संशोधकांसाठी मौलीक कार्य करणार्‍या संस्थेत पुरातत्वीय अवशेष, प्राचीन वस्तु, कलावस्तु, प्राचीन हस्तलिखीतांचे जतन व संवर्धन केले जाते.

ऐितिहासीक वारसा जप ण्याचे कार्य करणार्‍या राजवाडे संशोधन मंडळाचा यावर्षी संस्थास्तरावरील पुरूषोत्तम पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. अशी माहिती फाऊंडेशनचे सचिव प्राचार्य मकरंद पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

*