भडगाव पालिकेची करामत : कर्मचारी नसतांना निवासस्थानांचे बांधकाम : विना मंजुरी अग्निशमन बंबाची खरेदी

0

सुनील पाटील : भडगाव  :  ‘लग्ना आधिच मुल होणे म्हणजे काय’ हे भडगावातील पालिकेने बांधलेल्या अग्नीशमक केंद्रावरून दिसुन येते. शासनाकडुन अग्नीशमक केंद्रासाठी अद्याप कर्मचारी मंजुर नाही. मात्र त्या अगोदरच येथे पालिकेने भव्य केंद्राची उभारणी केली आहे. एवढेच नाही तर कर्मचार्‍यांसाठी निवासस्थानासह अग्नीशमक बंबाची खरेदि केली आहे.

२००९ मधे भडगाव ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपालिका अस्तित्वात आली. त्यामुळे शहरासाठी अग्नीशमक केंद्र असणे गरजेचे आहे. हे पालिकेच्या पदाधिकार्‍यांचे लक्षात आले. त्यांनी त्यादृष्टीने पाठपुरावा सुरू केला. पालिकेच्या माध्यमाने पाचोरा रस्त्याला ग्रामिण रूग्नालयाच्या समोरच्या जागेवर लाखो रूपये खर्च करून अग्नीशमक बंबाची खरेदी केली. केंद्राचे बांधकाम, कर्मचार्‍यांचे निवासस्थान बांधले.

अग्नीशमक केंद्र धुळखात

भडगाव नगरपालिकेने २०१३ मध्येे अग्नीशमक बंबाची खरेदि केली. त्यानंतर २०१४ ला ग्रामिण रूग्नालयासमोर अग्नीशमक केंद्राचे बांधकाम करण्यात आले. एवढेच नाही तर पालिकेने २०१५-१६ मध्ये कर्मचार्‍यांसाठी सुसज्ज चार निवासस्थान बांधली. अग्नीशमक केंद्र व निवासस्थानासाठी सरंक्षण भिंतही बांधण्यात आली.

यासाठी जवळपास एक कोटीपर्यंत खर्च करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडुन सांगण्यात आले. मात्र शासनानाकडुन या अग्नीशमक केंद्रासाठी अजुनपर्यंत एकही कर्मचार्‍याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बंब हा तसास उभा राहतो. तर केंद्रही धुळखात पडले आहे. प्रत्यक्षात कर्मचार्‍यांना मंजुरी केव्हा मिळेल? असा प्रश्न शहरवासियांकडुन विचारला जात आहे. आजही आगीची घटना घडल्यास हा बंब उपयोगात न येता शेजारील पालिकेच्या अग्नीशमक केंद्रावर अवलंबून राहावे लागते.

प्रस्ताव शासन दरबारी

पालिकेने २०१३ पासुन पालिकेच्या अग्नीशमक केंद्रासाठी आठ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. त्याबाबत सातत्याने शासनाच्या नगरविकास विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. पण शासन याकडे ढुकुंन पहायला तयार नसल्याचे चित्र आहे. कर्मचार्‍यांभावी अग्नीशमक बंब, केंद्र ’शो पीस’ ठरले आहे.

पालिकेकडे प्रशिक्षीत कर्मचारी नसल्याने हा बंब वापरात येत नाही. आजही शहरात, तालुक्यात आग लागल्यावर शेजारील पालिकेच्या बंबावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शासनाने कर्मचार्‍यांना मंजुरी देऊन केंद्र कार्यान्वित करावे, अशी मागणी होत आहे.

लग्ना आधिच मुल जन्माला!

पालिकेने शहरवासीयाच्या सोयीसाठी कोटी रूपये खर्च करून सुसज्ज अग्नीशमक केंद्राची उभारणी केली. एवढेच नाही अग्नीशमक बंबाची ही खरेदि केली. मात्र प्रत्यक्षात हे केंद्र चालविण्यासाठी सक्षम यंत्रणा म्हणजेच प्रशिक्षीत कर्मचारी लागतो, त्यालाच अद्याप शासनाने मंजुरी दिली नाही. त्यामुळे हा प्रकार म्हणजे लग्ना आधिच मुलांना जन्माला घालण्यासारखे आहे. त्यामुळे शासनाने याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

LEAVE A REPLY

*