आरोग्यसेविका चव्हाण यांना फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

0
अडावद, ता.चोपडा, | वार्ताहर :  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका चंद्रकला अविनाश चव्हाण यांना नर्सिग क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा सन २०१७चा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल या पुरस्काराचे वितरण दि.१२ रोजी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

५० हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन चंद्रकला चव्हाण यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी भारत सरकारचे स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्री जगत प्रकाश नंदा, केंद्रीय राज्य मंत्री ङ्गगनसिंग कालुस्ते, आरोग्य मंत्रालयाचे सचिव सी.के. मिश्रा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राष्ट्रपती भवनात आरोग्य सेविका चंद्रकला चव्हाण यांचा सन्मान सोहळ्यात त्याचे पती आरोग्य सेवक अविनाश चव्हाण, मुलगा जयेश चव्हाण, मुलगी असावरी चव्हाण, रुषीकेश पाटील, बहीण डॉ.जयश्री कदम,वनिता पाटील हे सहभागी झाले होते.

चंद्रकला चव्हाण यांना राष्ट्रपतीच्या हस्ते फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने त्यांची कर्मभुमी अडावद परीसर, सासर कानळदा (ता.जळगाव) तसेच माहेर मोहाडी (ता.दिंडोरी) येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

अडावद प्रा.आ.केंद्रात कार्यरत असलेल्या चंद्रकला अविनाश चव्हाण या कानळदा येथील सेवानवृत्त प्राथमिक शिक्षक यशवंत गिरधर चव्हाण यांच्या स्नुषा असून अविनाश चव्हाण, आरोग्यसेवक प्रा.आ.केंद्र अडावद, यांच्या पत्नी आहेत.

चंद्रकला चव्हाण यांनी यापूर्वी वडाळी भोई, हातेड, रिंगणगाव, चांदसणी येथे उत्कृष्ट कार्य केले आहे. सध्या त्या प्रा.आ.केंद्र अडावद येथे ओ.पी.डी. आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असून त्यांनी सन २००२ ते २००४ या वर्षात कुटूंब कल्याण कार्यक्रमात उत्कृष्ट काम करुन जिल्ह्यात सर्वात जास्त प्रसुती केल्याबद्दल त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहे.

तर २०१३-१४ मध्ये सर्वात जास्त कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याबद्दल पंचायत समितीमार्ङ्गत त्यांना प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. कमळगाव उपकेंद्रात त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटविला.

आरोग्य सेवेसोबत चंद्रकला चव्हाण यांनी त्यांच्या सासुबाई चित्राबाई यांच्या स्मृतीदिनी उपक्रम राबवित आहेत. सोबतच डॉ. बी.आर. पाटील, डॉ.दीपक पाटोडे, डॉ.किरण पाटील, डॉ.मावळे, डॉ.निलिमा देशमुख, डॉ. सचिन ठाकुर, डॉ.दत्तात्रेय बिराजदार, डॉ.निळे, डॉ.राष्ट्रपाल, डॉ. चौधरी, डॉ.किरण गोसावी, वसंत बैसाणे यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

*