‘मृदा विज्ञान’ पुस्तकाचे मोफत ऍप : कृषीशास्त्रज्ञ डॉ.गोपाल महाजन यांचा उपक्रम

0
प्रा.बी.एन.पाटील  | भातखंडे, ता.भडगाव  :   मृदा विज्ञान या विषयाच्या तयारीसाठी वापरता येणारे सॉईल सायन्सेस-ऍट अ ग्लान्स हे पुस्तक लेखक डॉ. गोपाल महाजन यांनी ऍप च्या स्वरुपात मोङ्गत उपलब्ध करुन दिले आहे.

भातखंडे येथील तरुण संशोधक डॉ. गोपाल रामदास महाजन हे गोवा या ठिकाणी कृषी शास्रज्ञ (मृदा विज्ञान) म्हणून आय. सी. ए. आर. केंद्रीय किनारी कृषी संशोधन केंद्र येथे रुजू आहेत. गोपाल महाजन यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण भातखंडे येथे झाले.

भारत देशात कृषी संशोधन व शिक्षणात अव्वल मानली जाणारी व नवी दिल्ली संस्था इंडिअन अँग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टीट्यूट, या संस्थेच्या परीक्षेत पाचवे स्थान मिळवले व या सोबत आय. सी. ए. आर. – सिनिअर रिसर्च ङ्गेलोशिप (दरमहा १४००० रुपये) देशात पहिले स्थान राखत मिळवली.

याच सोबत त्यांनी आपले पीएच.डी.चे शिक्षण याच संस्थेतून २००९ ते २०१२ दरम्यान पूर्ण केले. पीएच.डी. च्या दुसर्‍या वर्षी असताना भारतीय प्रशासकीय सेवा समकक्ष, अँग्रीकल्चरल सायनटीस्ट रिकृटमेन्ट बोर्डाच्या – अँग्रीकाल्चरल रिसर्च सर्विसेस (मृदा विज्ञान) परीक्षेत देशात तिसरा क्रमांक मिळवला.

डॉ. गोपाल महाजन यांनी सॉईल सायन्सेस-ऍट अ ग्लान्स हे पुस्तक लिहिले व प्रकाशित केले आहे. मृदा विज्ञान याकडे बहुतेक विद्यार्थ्यांचा कल कमी असतो. हा विषय सोपा व्हावा व हे ज्ञान अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे या करिता हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले.

मात्र यातही अभिनव आणि नाविन्य म्हणून त्यांनी ह्याच पुस्तकाचे मोबाईल ऍप बनवले. ह्या ऍपचे नाव आहे – ओब्जेकटीव सोइल सायन्सेस ( (Objective soil science PRO). विद्यार्थ्यांना अगदी गमतीशीर पद्धतीने अभ्यास करता यावा व त्यांच्या पर्यंत थेट पोहोचता याव हा या मागचा उद्देश. मात्र या ऍप ची किंमत गोपाल यांनी ४००रुपये एवढी ठेवली होती.

विद्यार्थ्यांची अडचण लक्ष्यात घेता हे ऍप त्यांनी सर्वांसाठी मोङ्गत केले आहे.कारण डॉ.गोपाल महाजन हे अत्यंत प्रतिकुल गेले आहेत. ते शिक्षण घेत असतांना भुमीहीन व बेघर होते त्या जाणीवेतुन ते गेल्याने विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींमुळे या पुस्तकापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी हे पाउल उचलले.

अवघ्या सहा महिन्यात या ऍप चा लाभ भारत, पाकिस्तान, ङ्गिलिपिन्स, नायजेरिया, बांगलादेश, नेपाळ अशा अनेक देशातील जवळपास ३२०० विद्यार्थ्यांनी घेतला आहे. याचा अर्थ असा, की यातून डॉ.गोपाल महाजन यांना रुपये १२ लाख ८० हजार इतके मानधन सहा महिन्यात व एका वर्षात साधारणत: २० लाख इतके मिळू शकले असते.

यासाठी गुगल प्ले स्टोरमध्ये  (Objective soil science PRO टाईप करावे व यादीमध्ये दिसणारे ऍप मोबाईल ङ्गोनमध्ये डाउनलोड व इन्स्टॉल करावे. ह्या ऍपमध्ये ८१ क्विझ आहेत व प्रत्येक क्विझमध्ये ३० प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या चार उत्तरांपैकी योग्य उत्तर निवडल्यास त्यानंतरचा प्रश्न सोडवायला मिळेल.

 

LEAVE A REPLY

*