जळगावला वाळू वाहतुकदारांचा बेमुदत बंद

0
जळगाव | प्रतिनिधी : महसूल, पोलिस व आरटीओ विभागाकडून होणार्‍या कारवाईच्या निषेधार्थ जिल्ह्यात बेमुदत वाळु वाहतुक बंद ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या वाळु वाहतुकदारांच्या बैठकीत घेण्यात आला.

जळगाव शहर बिल्डींग मटेरियल सप्लायर्स युनियनची बैठक आज बहिणाबाई उद्यानात पार पडली. जिल्ह्यातील वाळु ठेकेदारांकडून वाळु वाहतुकीची पावती घेवून मागणीप्रमाणे वाळु पुरविण्याचे काम वाळु वाहतुकदार करीत असतात.

मात्र परवाने व पावत्या असतांनाही महसूल, पोलिस आणि आरटीओ प्रशासनाकडून वाहने ताब्यात घेवून दंडात्मकक कारवाई केली जात आहे. वाहनचालकांकडून पावत्या हिसकावून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

प्रशासनाच्या या आडमुठेपणाच्या निषेधार्थ व वाळु वाहतुककदारांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील वाळु वाहतुक थांबवण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

प्रशासनाने वाळु वाहतुकदारांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देवून त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

बैठकीला दगडू सपकाळे, हाजी फिरोज खा अरमन खान पठाण, संजय ढेकळे, सुपडू सोनवणे, भिका नन्नवरे, नाना चौधरी, विठ्ठल पाटील, अनिल बच्छाव, संजय टेकावडे, अजय बढे, रवि सपकाळे, विलास यशवंते, कुलभूषण पाटील, चेतन शर्मा, बाबु पटेल यांच्यासह अडचशे वाळु वाहतुकदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*