Type to search

Breaking News maharashtra अर्थदूत आवर्जून वाचाच मार्केट बझ मुख्य बातम्या

अमेरीकी डॉलरपुढे भारतीय रूपयाचे अवमूल्यन

Share
मुंबई : अमेरिकी डॉलरपुढे भारतीय रूपयाची घसरण सुरूच असून परिस्थिती चिंताजनक बनत आहे. रूपयाच्या मृल्यात 37 पैशांची घसरण झाली असून प्रति डॉलर 71.58 अशा पातळीपर्यंत रूपया घसरत आहे.
का घसरतोय रूपया

‘आंतरराष्ट्रीय व्यापारयुद्धाची भीती व कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे रुपयाची घसरण होत आहे. या बाह्य गोष्टी सरकार नियंत्रित करू शकत नाही. रुपया लवकरच स्वत:हूनच सावरेल’, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्रालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

उत्पादन शुल्कमाफी नाहीच

रुपयाच्या अवमूल्यनामुळे इंधन आयातीवरील खर्च वाढत असून, पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही, अशी स्पष्टोक्ती अन्य एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने केली.  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत असून कच्च्या तेलाची प्रतिबॅरल किंमत मंगळवारी ७९.२६ डॉलरवर पोहोचली.

यामुळे डॉलर व रुपयातील तफावत वाढत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी एका सत्रात रुपया ७१.०९पर्यंत वधारला. मात्र दिवसभरात तो तब्बल ३७ पैशांनी घसरला.पेट्रोल व डिझेलमधील दरवाढही कायम असून मंगळवारी मुंबईत पेट्रोलचा दर १६ पैशांनी वाढून ८६.७२ रु. तर डिझेलचा दर २० पैशांनी वाढून ७५.७४ रु.वर पोहोचला.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत असून कच्च्या तेलाची प्रतिबॅरल किंमत मंगळवारी ७९.२६ डॉलरवर पोहोचली. यामुळे डॉलर व रुपयातील तफावत वाढत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी एका सत्रात रुपया ७१.०९पर्यंत वधारला. मात्र दिवसभरात तो तब्बल ३७ पैशांनी घसरला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!