शहरात 15 दिवसांसाठी तीन दिवसाआड पाणीपुरवठा

0

जळगाव । दि.21 । प्रतिनिधी-जळगाव शहरात दोन दिवसाआड नियोजित पाणीपुरवठा केला जातो. मात्र वाघुर धरणावरील 33 केव्हीच्या दोन ट्रान्सफार्मरपैकी एका ट्रान्सफार्मरमध्ये यांत्रिक बिघाड झाल्याने दुरुस्तीसाठी पाठविण्यात आला आहे.

त्यामुळे एका ट्रान्सफार्मरवर तीन विद्युत पंप जोडून पाणीपुरवठा केला जात असल्याने 15 दिवसांसाठी दोन दिवसाऐवजी तीन दिवस पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महापौर ललित कोल्हे यांनी दिली.

वाघुरधरणावरील दोन ट्रान्सफार्मरपैकी एका ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड आल्याने दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे तात्पूर्ती व्यवस्था म्हणून एका ट्रान्सफार्मरवर जोडणी करण्यात आली.

परंतु विद्युत प्रवाह वाढल्यास पुन्हा ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे चार विद्युत पंप न चालवता. तीन विद्युत पंप जोडून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

ट्रान्सफार्मर दुरुस्त करुन येईपर्यंत 15 दिवस दोन दिवसाऐवजी तीन दिवस पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावे, असे आवाहन देखील महापौर ललित कोल्हे यांनी केले आहे.
नवीन ट्रान्सफार्मर खरेदीचे आदेश

वाघुर धरणावरील दोन ट्रान्सफार्मरपैकी एक ट्रान्सफार्मर नादुरुस्त आहे. त्यामुळे नवीन ट्रान्सफार्मर उपलब्ध करण्याबाबत महापैार ललित कोल्हे यांनी प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी 35 ते 40 लाख किमतीचे नवीन ट्रान्सफार्मर खरेदी करण्याचे आदेश दिले.

आजपासून हातपंप, बोअरवेल दुरुस्ती

शहरातील सर्व नादुरुस्त बोअरवेल हातपंप दुरुस्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या जीएसडी विभागाकडील 10 दुरुस्तीसंच, कर्मचार्‍यांसह 8 दिवसात दुरुस्ती करण्याची सूचना प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली.

शनिवारपासून नियोजित पाणीपुरवठा
दि.23 रोजी या भागात होईल पाणीपुरवठा
नटराज टाकी ते चौघुले मळा, शनीपेठ, बळीरामपेठ, शनीपेठ, नविपेठ, हौसिंग सोसायटी, प्रतापनगर, गेंदालाल मिल, खडके चाळ, इंद्रप्रस्थ नगर, के.सी.पार्क, गेंदालाल मिल हुडको, रिंगरोड, भोईटे नगर, भिकमचंद जैन नगर, आकाशवाणी, जुनेगांव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, हेमुकलाणी टाकीवरील परिसर, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रिम कॉलनी, डी.एस.पी. टाकीवरील तांबापुरा, गणपती नगर, आदर्श नगर, प्रभात कॉलनी, ब्रुकबॉण्ड कॉलनी.

दि.24 रोजी या भागात होईल पाणीपुरवठा
वाल्मिकनगर, कांचननगर, दिनकर नगर, आसोदा रोड व परिसर, शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एस.एम.आय.टी. परिसर, सुप्रिम कॉलनी.

दि.25 रोजी या भागात होईल पाणीपुरवठा
रामेश्वर कॉलनी, एम.डी.एस कॉलनी, मास्टर कॉलनी, अक्सानगर, अयोध्यानगर, शांतिनिकेतन, गृहकुल कॉलनी, म्हाडा कॉलनी, अजिंठा सोसायटी, मोहननगर, नेहरुनगर, हरिविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, दांडेकर नगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी, द्रोपदी नगर, मूक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलीस कॉलनी, खोटेनगर, गेंदालाल मिल, शिवाजीनगर हुडको, प्रजापत नगर, एस.एम.आयटी परिसर, योगेश्वर नगर, हिरापाईप, शंकरराव नगर, खेडीगांव परिसर, तांबापूरा, शामाफायर, वाघनगर, हरिविठ्ठल नगर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर, जिल्हारोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, ऑफिसर क्लब.

दि.26 रोजी या भागात होईल पाणीपुरवठा
खंडेराव नगर, पिंप्राळा गावठाण, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबा नगर, मानराज टाकी परिसर, शिंदे नगर, अष्टभुजा, वाटीकाश्रम, निवृत्ती नगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी, नित्यानंदनगर, संभाजी नगर, रायसोनी नगर, समतानगर परिसर, सानेगुरूजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, गिरणा टाकी आवारातील उंच टाकी, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, मेहरुण गावठार, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इकबाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपूरी परिसर.

LEAVE A REPLY

*