जळगाव । दि.20 । प्रतिनिधी – नवरात्रोत्सव हा उद्यावर येवून ठेपला असून घरामध्ये नवरत्रोत्सवात घटाची स्थापना केली जात असते. घटाची स्थापना करण्यासासाठी घागर, टोपली, झेंडूची फुली यासह विविध पुजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी घटस्थापनेच्या पुर्वसंध्येला बाजापेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

दरम्यान यंदा साहित्य विक्रीची दुकाने गांधी मार्केट शेजारील मोकळी असलेल्या मनपाच्या जागेवर भरविण्यात आला आहे.

उद्या साजरा होणारा नवरात्रोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी शहरातील सार्वजनिक मंडळांकडून सर्व तयारी देखील पुर्ण झाली आहे.

तसेच नवरात्रोत्सवात नागरीकांकडून घरांमध्ये घटाची स्थापना नऊ दिवस मोठ्या भक्तीभावाने त्याची पुजा केली जात असते.

दरम्यान, घटाची स्थापना करण्यासाठी लागणारे घागर, झेंडूची फुले, टोपली, दिवा व पुजेचे साहित्य यासह दुर्गामातेच्या लहान मुर्ती विक्री करणारे दुकाने शहरतील अजिंठा चौफुली, कालिंका माता चौफुली, प्रभात चौकात विक्रेत्यांनी दुकान थाटली आहे.

तसेच घटासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत सकाळपासूनच नागरीकांनी गर्दी केली असल्याने घटस्थापनेच्या पुर्वसंध्येला बाजारपेठ रात्री उशीरपर्यंत गजबजलेली दिसून आली.

मोकळ्या जागेवर थाटली दुकाने
घटस्थापनेनिमीत्त शहरातील बळीरामपेठ, शिवाजीरोड यासह सुभाष चौकांमध्ये बाजार भरत असतो. परंतू मनपातील अतिक्रमण पथकाकडून याठिकाणी अतिक्रमणाची कारवाई केली जात असल्याने विक्रेत्यांनी गांधी मार्केट जवळील मोकळ्या जागेवर दोन दिवसांसाठी दुकाने लावण्याची परवानगी देण्यात आली असल्याने याठिकाणी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती.

मंडप बांधणीचे काम पूर्ण
शहरातील नगरांमध्ये व कॉलन्यांमध्ये सार्वजनिकम दुर्गोत्सव मंडळांतर्फे दुर्गामातेची स्थापना करण्यासाठी मंडळांकडून परप्रांतीय व स्थानिक मंडळबांधणार्‍या कारागीरांकडून गेल्या दहा दिवसांपासून मंडप बांधणीचे काम सुरु होते. दरम्यान, मंडप बांधणीचे काम आता पुर्ण झाले कॉन्यांमध्ये तसेच त्याच्या आजूबाजूच्या भागांमध्ये आकर्षक मंडळाकडून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मंडळाचे कार्यकर्ते देखील दुर्गामातेच्या आगमानाची आतुरतेने वाट बघत असून दुर्गामातेचे ढोल-ताश्यांच्या गजरात व जल्लोष पुर्ण वातावरणात आगमन करण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते सज्ज झाले आहे.

 

LEAVE A REPLY

*