मेलडी सुपर स्टार हिटस ऑक्रेस्ट्रा कलामहोत्सवाचे नृत्यकलाविष्काराने थाटात उद्घाटन

0

जळगाव |  प्रतिनिधी  : गीत झंकार निर्मित मेलडी सुपर हिट्स ऑस्क्रेट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कला महोत्सवाचे सोलो, शास्त्रीय व लावणी नृत्याविष्काराने थाटात उद्घाटन करण्यात आले.

बालगंधर्व खुले नाट्यगृहात तिन दिवसीय कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून नृत्य दिग्दर्शिका ऍड. महिमा मिश्रा, चित्रपट दिग्दर्शक संदीप दंडवते, अखिल तिलकपुरे, नगरसेविका ज्योती तायडे उपस्थित होते. तर व्यासपिठावर मेलडी सुपर स्टार ऑर्केस्ट्राचे अध्यक्ष विजयकुमार कोसोदे, मोहन तायडे उपस्थित होते.

यावेळी विजयकुमार कोसोदे यांनी मेलडी ऑस्क्रेट्राच्या प्रवासाविषयी गेल्या पन्नास वर्षांचा प्रवासाचे अनुभव त्यांनी यावेळी कथन केले. त्यानंतर संदीप दंडवते म्हणाले की गेल्या पन्नस वर्षांपासून एकच कला जोपासन राहणे ही एक विशेष बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

कलाविष्कारात नवोदित कलाकारांना कला सादर करण्याची संधी देण्यात येत असून यामध्ये नृत्य, मिमिक्री यांचे सादरीकरण करण्यात यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच दि. १३ व १४ रोजी हिंदी व मराठी बहारदार गीतांची मैफील यात रंगणार आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रतनकुमार थोरात यांनी केले. तर आभार शरद भालेराव यांनी मानले. तसेच कला सादर करणार्‍या प्रत्येक कलावंतांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा याप्रसंगी गौरव करण्यात आला.

अप्सरा आली लावणीने रसिकांना मोहिनी

कलामहोत्सवाची सुरुवात पुजा तायडे, तनिष्का कोळी या चिमुकल्यांनी नगाडे संग ढोल बाजे या गितावर नृत्याचे सादरीकरण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर दामिनी महाले व अंजली महाले या बहिणींनी अप्सरा आली, पिंगा ग पोरी पिंगा या गाण्यावर बहारदार लावणीचे सादरीकरण उपस्थितांवर मोहिनी टाकली होती.

चिमुकल्यांनी केले बहारदार नृत्याचे सादरीकरण

कार्यक्रमात श्रेयस बोरसे याने बद्री की दुल्हनिया यावर नृत्याचे सादरीकरण केले. त्यानंतर धिम ता दा रे या शास्त्रीय नृत्य, शट अप ऍण्ड बाऊन्स, यार ना मिले मर जावा, देस रंगीला, झिंगाट, बर्थ डे गाणे, उडी उडी, रोके ना रुके नैना, बद्री कि, काला चष्मा यासारख्या अनेक हिंदी, मराठी गीतांवर कलावंतांनी नृत्य सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली.

 

LEAVE A REPLY

*