जळगावच्या व.वा. (गोलाणी) मार्केटमधील वीज मीटर रूमला आग

0
जळगाव | प्रतिनिधी :  येथील व.वा. (गोलाणी) मार्केटच्या तीसर्‍या मजल्यावरील वीज मिटर रूमला आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानकपणे आग लागली.

वीज मिटर रूममधील सर्व वायरी जळाल्याने काळा धुर मार्केटमध्ये पसरून वायरींच्या
वासाने नागरीक त्रस्त झालेत.

अग्निशमन यंत्रणेतील पाईप व अन्य साधणे नादुरूस्त असल्याने अग्निशमन विभागाचा बंब येवूनही काही उपयोग
झाला नाही. शेवटी नागरीकांनीच बादलीने पाणी तिसर्‍या मजल्यापर्यंत नेत आग विझवली.

या आगीत अनेकांची वीज मिटरसह वायरी जळून खाक झाल्या आहेत.

(या घटनेचा व्हिडीओ पाहा देशदूत फेसबुकवर)

LEAVE A REPLY

*