Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

फेरमूल्यांकनानंतर जळगावकरांवर मालमत्ता करवाढीचा बोजा

Share
जळगाव । । प्रतिनिधी :  जळगाव शहरातील मालमत्तांचे गेल्या 18 वर्षानंतर फेरमूल्यांकन करुन मालमत्ताकराची आकारणी केली जाणार आहे. अमरावती येथील स्थापत्य कन्सलटन्सीच्या माध्यमातुन आकारणीचे काम सुरु असून आतापर्यंत 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. फेरमुल्यांकनामुळे मालमत्ताकराची वाढ होणार आहे.

जळगाव शहरात जवळपास 1 लाख मिळकती आहेत. बर्‍याच मिळकतींवर कर आकारणी केली गेली नाही. तसेच काही मिळकतधारकांनी दुसर्‍या मजल्यावर बांधकाम केल्यानंतरही आकारणी होत नसल्याच्या प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे तब्बल 18 वर्षानंतर मालमत्तांचे फेरमूल्यांकनकरुन आकारणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अमरावती येथील स्थापत्य कन्सलटन्सी या कंपनीला मक्ता देण्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासुन कंपनीच्या माध्यमातुन शहरात फेरमुल्यांकनाचे काम सुरु आहे. आतापर्यंत 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

मालमत्ताकराची मागणी 100 कोटीच्या वर जाणार

शहरातील मालमत्तांचे सन 2000 पासुन फेरमूल्यांकनझालेले नाही. आधी पहिला मजला 75 टक्के आकारणी वरचा मजला 50 टक्के कर आकारणी केली जात होती. मात्र आता पहिल्या मजल्यावर 100 टक्के आकारणी दुसरा मजला 95 टक्के तर तिसरा मजला 80 टक्के आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे मालमत्ताकराची वाढ होणार आहे. सध्या मालमत्ताकराची 50 कोटीची मागणी असून फेरमुल्यांकनाचे काम पूर्ण झाल्यानंतर मालमत्ताकराची 100 कोटीच्या वर जाणार असल्याची माहिती सुत्रांनी सांगितले.

लिफ्ट असलेल्या पाचव्या मजल्यापासुन कराची वाढीव आकारणी

लिफ्ट असलेल्या बहुमजली इमारतीत चौैथ्या मजल्यापर्यंत कराची 100 टक्के आकारणी केली जाणार आहे. परंतु पाचव्या मजल्यापासुन किमान त्यात 5 ते 10 टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे मिळकतधारकांना करवाढीचा सामना करावा लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!