स्टीम इंजिन रेवाडी प्रवासासाठी सज्ज

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  येथील लोकोशेडमध्ये अडगळीत पडलेले वाफेवरीत इंजिनाची तज्ञांंकडून दुरुस्तीपूर्ण केली असून इंजिनाचे (इंजिन क्र. ७०००/डब्लु.पी) आयुर्मान आणखी ५० वर्षांनी वाढले असून हे इंजिन रेवाडी येथील लोकोशेडमध्ये जाण्यासाठी सज्ज झाले आहे. इंजिन दि. १४ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री उशीरा रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

येथील लोको शेडमधील इंजिनाची दुरुस्ती करुन इंजिनाचा उपयोग दिल्ली ते अलवार राजस्थान पर्यटकांच्या पर्यटनासाठी होणार आहे. इंजिनाच्या फ्रंट बोगीत ६५ कीलो ग्रॅम ग्रीस भरण्यात आले असून कालबाह्य झालेल्या या इंजिनाचे आयुर्मान आता ५० वर्षांची वाढले आहे.

इंजिनाच्या तीनही चाकांमध्ये ४-४ कीलोग्रॅम ग्रीस भरण्यात आले आहे. इंजिन रेल्वे मार्गावर धावण्यासाठी तयार झाले आहे. इंजिन मार्गावर धावतांना सुरुवातीला ताशी ३० की.मी. वेगाने चालविण्यात येणार आहे. यानंतर ४० व आवश्यकतेनुसात ताशी ५० की.मी. वेगाने चालविण्यात येणार आहे.

ताशी वेग वाढवितांना वेेळेवेळी इंजिनाची तपासणी करुन त्याची कार्यक्षमताही तपासण्यात येणार आहे. हे इंजिन रेवाडी लोको शेडमध्ये घेवून जाण्यासाठी डिझेल इंजिन क्र १६३५९ तयार ठेवण्यात आले आहे. या इंजिनासह दुरुस्ती पथकासाठी एकजनरल डबा (क्र ०६४१०) अशी व्यवस्था डीआरएम कार्यालयाकडून करुन देण्यात आली आहे.

ही गाडी भुसावळ, इटारसी, झाशी, आग्रा या मुख्यमार्गावर धावणार आहे. तसेच आग्रा येथून बांधीकुई, अल्वर मार्गे रेवाडी येथील स्टीम लोको शेडमध्ये दाखल होणार आहे. यासाठी आठवडाभराचा काळ लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*