बसस्थानकातून विद्यार्थीनीचा मोबाईल लंपास

0

जळगाव। दि. 14 । प्रतिनिधी-शहरातील नवीन बसस्थानकातून बसमध्ये चढतांना विद्यार्थींनीचा मोबाईल अज्ञात चोरटयांने लांबवून नेल्याची घटना आज दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली.

दरम्यान विद्यार्थींनी मोबाईल चोरीला गेल्याचे सांगत चालकास बस जिल्हापेठ पोलिसात नेण्यास सांगितले. याठिकाणी जवळपास अर्धातास बसमधील प्रवाशांची तपासणी करण्यात आली. परंतू मोबाईल मिळून आला नाही. त्यानंतर बस 3.10 मिनीटांनी मार्गेस्थ झाली.

याबाबत प्रत्यक्षदर्शी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिरसोली येथील सुनिता रघुनाथ काटोले ही विद्यार्थींनी धनाजी नाना महाविद्यालयात एमएसडब्ल्यु च्या प्रथम वर्षाला शिक्षण घेते.

महाविद्यालयातून घरी जाण्यासाठी ही विद्यार्थीनी नवीन बस स्थानकावर आली. यावेळी दुपारी 2.30 वाजेच्या पाचोरा आगाराच्या एमएच 20 बीएल 1836 क्रमांकाच्या बसमध्ये चढत असतांना या विद्यार्थीर्नीच्या बॅगेतून सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरटयाने चोरून नेला.

बस नवीन बसस्थानकातून निघताच मोबाईल चोरीला गेल्याचे विद्यार्थींनीच्या लक्षात आले. यावेळी विद्यार्थींनी बसचालक ज्ञानेश्वर पाटील यांना बस जिल्हापेठ पोलिस स्टेशनला नेण्यास सांगितली.

जिल्हापेठ पोलिस स्टेशनला बसमधील प्रवाशांची तपासणी
बस जिल्हापेठ पोलिस स्टेशनला आणल्यानंतर सुनिता काटोले यांनी मोबाईल चोरीला गेल्याचे सांगितले. यावेळी डीबी पथकातील नाना तायडे, अजित पाटील, महेंद्र ठाकूर, शेखर पाटील, सुरवाडे यांनी बसमधील प्रवाश्याची अर्धा तास तपासणी केली. परंतु मोबाईल मिळून आला नाही. त्यानंतर दुपारी 3.10 मिनीटांनी बस पाचोर्‍याकडे मार्गेस्थ झाली. दरम्यान मोबाईल चोरीप्रकरणी पोलिसात कुठलीही नोंद नव्हती.

LEAVE A REPLY

*