बेशिस्त वाहनधारकांविरुद्ध पोलिसांचा दंडूका : दहा महिन्यात ३९ हजार ६७५ वाहनावंर कारवाई – ६१ लाखाचा दंड वसूल

0
जळगाव | प्रतिनिधी : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून गेल्या दहा महिन्यात शहर वाहतुक शाखेतर्फे जनजागृती उपक्रमांसह कारवाईचा दंडूका उगारण्यात आला. यात सुमारे ३९ हजार ६७५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यातुन ६१ लाख १८ हजार ३०० रुपयांपर्यंत दंडही वसुल करण्यात आला आहे. यामूळे शहरात काहीअंशी अपघाताचे प्रमाण घटले.

शहराची वाढती लोकसंख्या पाहता वाहनांची रहदारीही वाढली. शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी चौकात सिग्नल यंत्रणा आहे. मात्र ती बंद असल्याने अडचण येत आहे.

२५ सिग्नल शहर वाहतुक शाखेतर्फे स्वयंचलीत करण्यात आले. यामूळे अपघातांमध्ये घट झाली आहे. वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जनजागृतीपर पंधरवडासह अनेक उपक्रम वाहतुक विभागाने राबविले.

यामध्ये झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईन, पार्कींग पट्टे आखणे, विचीत्र नंबर प्लेट धारकांसह, कागदपत्रे न बाळगणार्‍या रिक्षा चालकांवर कारवाई सुरु केली आहे. तसेच ज्या रिक्षाजवळ कागदपत्रांची पुर्तता आहे अश्या रिक्षांना विशेष स्टिकर्स लावण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.

१०३ वाहने निलंबीत

जुन २०१६ ते मार्च २०१७ दरम्यान अवैध प्रवासी वाहतुक करणार्‍या १०३ वाहनांचे निलंबन करण्यात आले. तसेच ३८ हजार ९०९ वाहन धारकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ६१ लाख १८ हजार ३०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

तर ७६६ अवैध प्रवासी वाहतुक करणार्‍या वाहनांविरुध्द न्यायालयात खटले भरण्यात आले आहेत.

वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळलेच पाहिजेत. गेल्या दहा महिन्यामध्ये अवैध दारु वाहतुक व सोनसाखळी चोरीतील गुन्ह्यातील संशयीतांनाही शहर वाहतुक पोलीसांनी पकडले.बेशिस्त वाहनधारकांविरुध्द कारवाईची मोहीम सुरुच राहणार आहे.
– पोनि.अनिल देशमूख, शहर वाहतुक    

LEAVE A REPLY

*