जळगावात १६ पासून रंगणार पुरुषोत्तम करंडक स्पर्धा

0
जळगाव |  प्रतिनिधी :  खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालयात पुरुषोत्तक करंडक स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी महाविद्यायात लॉट्स काढण्यात येणार असून या स्पर्धेसाठी एकून १५ संघांनी सहभाग घेतला आहे.

मुळजी जेठा महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभाग आणि महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे यांच्यातर्फे पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा दि. १६ ते १८ रोजी पर्यंत भैय्या साहेब गंधे सभागृहात आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी  लॉट्स काढण्यात असून यात एकूण १५ संघांच्या एकांकिका सादर होणार आहे.

एकांकीका स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ नांदेड या तीनही विद्यापीठातील अंतर्गत महाविद्यालय सहभागी झालेले आहेत. महाविद्यालयात महाराष्ट्रीय कलोपासक यांचे प्रतिनिधी राजेंद्र नांगरे, शशिकांत वडोदकर, प्रा.चारुदत्त गोखले, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी या मान्यवरांच्या समक्ष लॉट्स काढण्यात आले.

प्रसंगी स्पर्धेत सहभागी महाविद्यालयांचे विद्यार्थी प्रतिनिधी आणि प्राध्यापक उपस्थित होते. राजेंद्र नांगरे यांनी पुरुषोत्तम करंडकाविषयी भूमिका स्पष्ट केली. स्पर्धेचे नियम अटींच्या संदर्भात स्पर्धकांना मार्गदर्शन केले. दरम्यान सदर स्पर्धा दि. १६ रोजी दुपारी ४ वाजता सुरु होईल.

पहिल्या दिवशी जळगावातील ४ एकांकिका सादर होतील. दि. १७ रोजी दुपारच्या सत्रात खानदेशातील ८ एकांकिकांचे सादरीकरण होईल. यानंतर दि. १८ रोजी तीन एकांतीका सादर झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*