महसुल, पोलीस, आरटीओंच्या अन्यायाविरोधात डंपर, ट्रॅक्टरसह वाळू वाहतुकदारांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

0
जळगाव |  प्रतिनिधी : महसुल, पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडुन होणार्‍या अन्यायाविरोधात आज शहरातील वाळु वाहतुकदारांनी डंपर, ट्रक आणि ट्रॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. तसेच प्रशासनाला निवेदनही देण्यात आले.

वाळु वाहतुकीसाठी लागणार्‍या सर्व कागदपत्रांची पुर्तता करूनही महसुल, पोलीस आणि आरटीओंकडुन वाळु वाहतुकदारांवर सर्रासपणे कारवाई केली जात आहे. वाहन चालकांकडुन बेकायदेशीररित्या वाहनांच्या चाव्या हिसकावुन अधिकारी वाळुची वाहने जप्त करीत आहेत.

आरडीसी राहुल मुंडके यांना निवेदन देतांना वाळु वाहतुकदार.

याबाबत प्रांताधिकारी जलज शर्मा यांना भेटावयास गेलेल्यांना अपमानास्पद वागणुक मिळत असल्याची तक्रार वाळु वाहतुक दारांनी केली आहे. प्रशासनाच्या या अन्यायाविरोधात आज वाळु वाहतुकदार एकवटले.

जळगाव शहर बिल्डींग मटेरीयल सप्लायर युनियनच्या नेतृत्वाखाली वाळु वाहतुकदारांनी वाहनांसह नेरी नाका येथुन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

तसेच मागण्यांचे निवेदनही संघटनेतर्फे देण्यात आले. यावेळी संजय ढेकळे, चेतन शर्मा, कुलभुषण पाटील, अजय बढे, दगडु सपकाळे, अमित बच्छाव, सुपडु सोनवणे, पद्माकर भोळे, किरण चौधरी, रविंद्र सपकाळे, आनंद सपकाळे, सुकदेव सपकाळे, भिकन नन्नवरे, नाना चौधरी, ऍड. गोविंद तिवारी आदी उपस्थित होते.

आंदोलकांना अटक

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार्‍या वाळु वाहतुकदारांचे आंदोलन दडपण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आलेल्या या मोर्चातील आंदोलकांना पोलीसांनी अटक करून त्यांची वाहनेही जप्त केली.

LEAVE A REPLY

*