जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

0
जळगाव / जिल्हा कारागृहामध्ये बंद्यांच्या दोन गटात हाणामारी झाल्याच्या वृत्ताने कारागृह पुन्हा चर्चेत आले आहे.
हाणामारी झाल्याच्या वृत्ताला कारागृह प्रशासनाने दुजोरा दिला नसला तरी बंद्यांनी उपोषणही केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

जिल्हा कारागृहात नविन प्रभारी म्हणून आलेले कारागृह अधिक्षक हे कैद्यांचा छळ करतात, तसेच कारागृहात कैद्यांना मारहाण व कैद्यांची उपोषण याबाबत माहिती आज शहरात सर्वत्र फिरत होती.

याबाबत 1 ते 12 बँरेकमधील कैद्यांनी मुख्य न्यायाधीश यांना कारागृह अधिक्षक यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज केला असल्याचे समोर आले आहे.

प्रभारी कारागृह अधिक्षक म्हणून सुनील कुंवर यांची नेमणूक करण्यात आली होती. कारागृहात गुरुवारी कैद्यांना मारहाण, शिवीगाळ करून मानसिक व शारिरीक छळ करत असल्याचा व तसेच कैद्यांच्या कोर्‍या कागदावर सह्या घेतल्या असल्याचे आरोप अर्जामध्ये नमूद केले आहे.

याबाबत शहरात आज सर्वत्र चर्चा सुरू होती. याबाबत कारागृह प्रशासनाचे मत जाणून घेतले असता असे कोणतेही घटना झाली नसून केवळ अफवा पसरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र तक्रार अर्जामूळे कारागृहामधील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

LEAVE A REPLY

*