विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांची हातचलाखी

0
जळगाव । दि. 6 । प्रतिनिधी-बाप्पाला निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत कोर्ट चौक ते घाणेकर चौकादरम्यान चोरटयांनी हातचलाखी करून पाच मोबाईल व पाकीटे लांबविली. याबाबत शहर पोलिसात तक्रार देण्यात आल्या आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोर्ट चौकापासून विसर्जन मिरवणुकीला ढोलताशाच्या गजरात सुरवात झाली होती.

रात्री उशिरापर्यंत शहरात मिरवणुका सुरु होत्या. विसर्जन मिरवणुकीमधील आरास, लेझीम व ढोल ताश्यांची जुगलबंदी पाहण्यासाठी भाविकांची चांगलीच गर्दी झाली होती.

या गर्दीचा फायदा घेत प्रशांत हेमंत जुवेकर रा. द्रोपदी नगर, भरतसिंग रामसिंग परदेशी रा. जळगाव, अमर राजू पवार रा. मेस्कोमाता नगर, निलेश रमेश कोळी रा. हरिओम नगर, नितीन गजानन साळुखे रा. शाहुनगर यांच्या खिशातून महागडे मोबाईल चोरटयांनी लांबविल्याच्या घटना घडल्या. याबाबत शहर पोलिसात तक्रारी देण्यात आल्या आहे.

शहरातून दोन मोटारसायकली लंपास
विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या दोन गणेशभक्तांच्या मोटारसायकली अज्ञात चोरटयांनी लांबविल्याच्या घटना घडल्या.

गेंदालाल मिल येथील अजय सोनवणे हे त्यांची मोटारसायकल क्रमात एमएच 19 एके 7029 ने विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी आले होते. त्यांनी त्यांची मोटारसायकल शिवा गणेश मंडळाच्या जवळील अमर रगडा दुकानाच्या जवळ लावली होती.

त्यानंतर ते मिरवणुक पाहण्यासाठी गेले. रात्री परतल्यानंतर त्यांची मोटारसायकल दिसून आली नसल्याचे चोरीला गेल्याचे समजले.

तसेच भुषण प्रकाश नेवे रा. गुरुदत्त कॉलनी यांनी त्यांची एमएच 19 बीएस 0328 क्रमाकांची मोटारसायकल जे.के पान सेंटरजवळ लावली होती. मिरवणुक पाहून आल्यानंतर नेवे यांना देखील त्यांची मोटारसायकल दिसून आली नाही.

तसेच रेल्वे स्टेशन परिसरात ईश्वर दगडु कोळी रा. अडावद रांनी रिक्षा क्रं. एमएच.19.बी.जे.6934 ही उभी केली होती. रात्री अज्ञात चोरट्यांनी रिक्षातून बॅटरी चोरून नेली आहे. त्यांनी देखील शहर पोलिसात तक्रार दिली आहे.

LEAVE A REPLY

*