पाच वाद्यांच्या नादस्वरांचा ‘अनाहत’ शनिवारी घेणार रसीकजणांचा ठाव

0
जळगाव । दि.31। प्रतिनिधी :  संवादिनी, तबला, सारंगी, बासरी व घुंगरू अशा तब्बल पाच वाद्यांच्या नादस्वरांवर शास्त्रीय नृत्याचा अविष्कार उद्या शनिवार दि.1 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ला.ना. विद्यालयाच्या गंधे सभागृहात जळगावकर रसीकजणांना अनुभवायास मिळणार आहे.

येथील प्रभाकर कला संगीत अकॅडमीतर्फे ‘ अनाहत’ या शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नामवंत वादकांनी व कलावंताच्या नृत्याने रंगणार मैफिल

शास्त्रीय संगीतातील नृत्यात प्रभाकर कला अकॅडमीने जळगावकर रसीकांच्या मनावर गारूड केले आहे. उद्या शनिवारी (दि.1 सप्टेबर) रोजी होणार्‍या अनाहत या कार्यक्रमात भुसावळचे तबला वादक तेजस मराठे, जळगावचे संवादिनी वादक व गायक कपिल शिंगाने, प्रिंया सायखेडे, शिरसोलीचे गासरी वादक संजय सोनवणे तर मुंबईचे सारंगी वादक कौशल कुमार यांच्या संगीत साथीने आणि प्रभाकर अकॅडमीच्या नृत्य साधकांच्या नृत्याने अनाहत मैफिल रंगणार आहे.

या मैफलीस रसीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अकॉडमीच्या संचालीका डॉ. अपर्णा भट कासार व किरण कासार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*