ताडोबाच्या बफर व कोर झोनमध्ये 62 वाघांचे दर्शन

0
चंद्रपूर / बुद्ध पौर्णिमेच्या रात्री ताडोबा अंधारी व्याघ— प्रकल्पाच्या कोर विभागातील प्रगणनेकरीता 82 मचानांवरुन निरीक्षण करणार्?या वन्यजीव प्रेमी व क्षेत्रीय कर्मचार्?यांनी 35 वाघांची नोंद घेतली आहे.
वाघांसह वेगवेळ्या 4497 वन्य प्राण्यांची नोंद या उपक्रमाद्वारे झाल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ— प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) डॉ.किशोर मानकर यांनी दिली आहे.
ताडोबाच्या जंगलातील आतील भाग (कोर) व जंगलाबाहेर (बफर) झालेल्या प्रगणनेत एकूण 62 वाघांचे दर्शन झाले आहे.

काल बफर झोनमधील 27 वाघासह एकूण 2737 प्राणी वन्यजीव प्रेमींना दिसून आले होते.

आज ही संख्या 35 वाघासह 4497 आहे. ताडोबा व्याघ— प्रकल्पातील कोर झोनमध्ये येणार्?या ताडोबा, कोळसा व मोहर्ली या तीन परिक्षेत्रामध्ये पाणवट्यांवर वन्यप्राणी प्रगणना कार्यक्रम राबविण्यात आला होता.

यासाठी 82 मचाणी वरुन दोन प्रगणक व एक वनविभागाचा कर्मचारी असे तीन लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

ताडोबा, कोळसा व मोहर्ली या तीन परिक्षेत्रामध्ये ही प्रगणना करण्यात आली. यामध्ये 35 वाघांची नोंद करण्यात आली. त्याचप्रमाणे अन्य प्राण्यांचीही नोंद करण्यात आलेली असून त्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे.

 

LEAVE A REPLY

*