जलयुक्त शिवार अभियानामुळे दुष्काळमुक्तीकडे वाटचाल- प्रा. राम शिंदे

0
जळगाव / जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात जलसंधारण उपचारांनुसार कामे हाती घेऊन पूर्ण करण्यात येत असून जळगाव जिल्हा हा 100 टक्के कामे पूर्ण करणार्‍या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे.
या जलसंधारण उपचारांमुळे राज्याची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरु आहे, असे प्रतिपादन जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीनंतर ते आज पत्रकारांशी बोलत होते.

या अभियानांतर्गत समाविष्ट टँकरफेड गावांमधील पाणी टंचाईचा प्रश्न सुटला असून जिल्ह्याची टँकरमुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरु आहे.

जलसंधारण ही लोकचळवळ झाली असून शेतीसाठी व पिण्याचे पाणी काटकसरीने वापरण्याची मानसिकता जनमाणसात तयार झालेली आहे.

राज्यातील धरणे व जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने धरणांमधील गाळ काढून तो शेतात वापरण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना महाराष्ट्र शासनाने नुकतीच सुरु केली आहे.

या योजने अंतर्गत जिल्ह्यातील लघुपाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गावतलाव, पाझरतलाव इ. तलावातील गाळ स्थानिक शेतकर्‍यांना मोफत मिळणार असून त्यांना तो स्व-खर्चाने वाहून न्यावा लागणार आहे.

गाळ उपसण्यासाठी लागणारी यंत्र सामग—ी व इंधनावरील खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे.

गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे यादृष्टीने जलसंधारण उपचारांची निवड केली जाते. योजनेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी कटाक्षाने काळजी घेण्यात येते.

 

LEAVE A REPLY

*