पथक दिसताच ट्रॅक्टरमधील वाळू फेकून चालक पसार

0
जळगाव । दि. 1 । प्रतिनिधी-महसुल विभागाचे पथक दिसताच टॅ्रक्टरमधील वाळ फेकून देत चालक ट्रॅक्टरसह पसार झाल्याची घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास मोहाडी गावाजवळ घडली. पथकाने टॅ्रक्टर मोहाडी गावाजवळ थांबवून चालकास टॅ्रक्टर एमआयडीसी पोलिसात नेण्यास सांगितले. एमआयडीसी पोलिसात ट्रॅक्टरचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून व महसुल विभागाच्या पथकाकडून मिळालेली माहिती अशी की, नाझगिरी येथील गिरणानदीपात्रातून ट्रॅक्टर, डंपरव्दारे अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती तलाठी राहूल पिंतांबर अहिरे यांना मिळाली होती.

त्यानुसार तलाठी अहिरे यांच्यासह फिरत्या पथकातील म्हसावद भाग जगदीश गुरव, तलाठी सचिन माळी, रमेश वंजारी, मनोज सोनवणे यांनी शुक्रवारी सकाळी मोहाडी-नागझिरी रोडवर सापळा रचला.

त्यानुसार नागझिरीकडून मोहाडी गावाकडे येत असलेल्या एका विना नंबरच्या ट्रॅक्टरला अडविले. चालकास नाव विचारुन वाळू वाहतुकीचा परवान्याबाबत विचारपुस केली.

चालकाने भुषण सुधाकर चव्हाण असे नाव सांगत तलाठी अहिरे यांच्याशी अरेरावी केली. अहिरे यांनी त्याला पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर घेण्यास सांगितले परंतू चालकाने मोहाडीपर्यंत पथकाच्या सोबत राहिल्यानंतर पथकाला तुरी देत चालक ट्रॅक्टर घेवून पसार झाला.

पथकाने त्याचा पाठलाग केला असता मोहाडीजवळ ट्रॅक्टरमधील एक ब्रॉस वाळू रस्त्यावर टाकून पसार झाला. यादरम्यान त्याने मोहाडी गावाजवळ पोहचण्याआधीच संपर्क साधून काही माणसे जमविली होती.

सुरक्षेच्या कारणास्तव कर्मचार्‍यांनी घटनास्थळावरुन थेट एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून ट्रॅक्टरचालकाविरुध्द फिर्याद दिली .

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर चालक व मालक भूषण चव्हाण रा. धानोरा याच्याविरुध्द वाळू चोरीसह शासकीय कामात अडथळा असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

 

LEAVE A REPLY

*