महापौर निवडणुकीसाठी खाविआ, मनसे नगरसेवकांना व्हीप

0
जळगाव । दि.30 । प्रतिनिधी – महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून दि.7 रोजी महापौर निवडीची विशेष सभा होणार आहे. महापौर पदाचे उमेदवार म्हणून मनसेचे ललित कोल्हे यांचे नाव निश्चित झाले आहे.
दरम्यान, खाविआचे नेते रमेशदादा जैन आणि मनसेचे गटनेते तथा उपमहापौर ललित कोल्हे यांनी यांनी नगरसेवकांना व्हीप बजावले आहे.
महानगरपालिकेत खाविआला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे मनसेच्या पाठींब्यावर सत्ता स्थापन केली. मनसेने पाठींबा दिल्यामुळे वर्षभरासाठी महापौर पद देण्याचे आश्वासन ललित कोल्हे यांना खाविआचे नेते माजी आ.सुरेशदादा जैन, अध्यक्ष रमेशदादा जैन यांनी दिले होते.

खाविआचे नितीन लढ्ढा यांनी सुरेशदादा जैन यांच्या आदेशान्वये महापौर पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महापौर पदाचे उमेदवार म्हणून ललित कोल्हे यांचे नाव निश्चित झाले आहे.

दरम्यान महापौर निवडीसाठी विभागीय आयुक्तांनी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

येत्या दि.7 रोजी महापौर निवडीची सभा होणार आहे. राजकीय हालचाली लक्षात घेता. खाविआ आणि मनसेच्या नगरसेवकांना व्हिप बजावले आहे.

रमेशदादा जैन, ललित कोल्हे यांनी बजावले व्हीप
महापौर पदाच्या निवडीसाठी दि.7 रोजी विशेष सभा होणार आहे. या सभेला सर्व नगरसेवकांनी हजर राहावे. व पक्षाने निर्देशित करेल त्या उमेदवाराला मतदान करावे.

असे पक्षादेश (व्हीप) खाविआच्या नगरसेवकांना रमेशदादा जैन यांच्या स्वाक्षरीने तर मनसेच्या नगरसेवकांना गटनेते तथा उपमहापौर ललित कोल्हे यांच्या स्वाक्षरीने बजावण्यात आले आहे.

सुनिल महाजन, नवनाथ दारकुंडेंनी घेतले अजर्र्
महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. दि.7 रोजी निवड होणार असून दि.5 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. खाविआचे नगरसेवक सुनिल महाजन यांनी मनसेचे उमेदवार ललित कोल्हे यांच्यासाठी चार उमेदवारी अर्ज तर भाजप पुरस्कृत तथा अपक्ष नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी 1 अर्ज घेतले आहे.

LEAVE A REPLY

*