अद्ययावत फायर फायटर खरेदीसाठी शासनाची मंजूरी

0
जळगाव । दि.30 । प्रतिनिधी-महानगरपालिकेला अद्ययावत फायर फायटर खरेदी करण्यासाठी शासनाने मंजूरी दिली आहे. तसेच 1 कोटी 34 लाखाचा निधी प्राप्त असून अग्निशमन यंत्रणा बळकट करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी महापौर ललित कोल्हे यांनी दिली.
महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला मंजूर झालेला निधी पडून आहे. याबाबत स्थायी समिती आणि महासभेत फायर फायटर घेण्याबाबत चर्चा झाली होती. महापालिकेची अग्निशमन यंत्रणा कुचकामी आहे.

चार फायर फायटरपैकी केवळ दोन फायर फायटर सुस्थितीत आहे. शहर विस्ताराच्या अनुषंगाने अग्निशमन यंत्रणा तोकडी ठरत आहे. त्यामुळे अग्निशमन यंत्रणा बळकट करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

त्यानुसार प्राप्त झालेल्या 1 कोटी 34 लाखाच्या निधीतून 3 मोठे फायर फायटर, 1 मिनी फायर फायटर, 2 बुलेट फायर फायटर, 1 लॅडर खरेदी करण्यात येणार असल्याचे प्रभारी महापौर ललित कोल्हे यांनी सांगितले.

48 लाखाचे अद्ययावत फायर फायटर
सर्व सुविधायुक्त अद्ययावत फायर फायटर खरेदी करण्यासाठी शासनाने तांत्रिक मान्यता दिली आहेे. त्यामुळे लवकरच 48 लाखाचे 1 फायर फायटर खरेदी करण्यात येणार असल्याचे माहिती प्रभारी महापौर ललित कोल्हे यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*