मोबाईल शोधणार्‍या 2 सफाई कामगारांचा गटारीत गुदमरुन मृत्यू

0
मुंबई / गटाराची साफसफाई झाल्यानंतर पडलेला मोबाईल शोधण्यासाठी पुन्हा गटारात उतरलेल्या युवकाचा आणि त्याला शोधण्यासाठी गेलेल्या दुसर्‍या सफाई कामगाराचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची घटना चांदिवली फार्म रोड येथील कमानी ऑॅइल मिलजवळ घडली.
अजय कुंचीकुर्वे आणि सचिन पवार हे दोघे तरुण खाजगीरित्या गटारीचे साफसफाईचे काम करण्यासाठी चांदिवली फार्म रोड येथील कमानी ऑॅइल मिलजवळ गेले होते.

गटार साफसफाईचे काम नीट झाले का हे वाकून पाहताना अजय या सफाई कामगाराचा मोबाईल गटारीत पडला.

म्हणून तो मोबाईल घेण्यासाठी आत उतरला, मात्र त्याला श्वसनाचा त्रास होऊन तो बेशुद्ध झाला.

तेव्हा त्याला वाचवण्यासाठी दुसरा मित्र सचिनही गटारीत उतरला. त्यालाही त्रास झाला अन् तो सुध्दा बेशुद्ध पडला.

ही बाब तेथून जाणार्‍या एका व्यक्तीच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस आणि अग्नीशमन दलास बोलावले.

उपचारा दरम्यान दोघांचाही दुर्दैर्वी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून साकीनाका पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहे.

 

LEAVE A REPLY

*