पाचोर्‍याच्या शिंदे ऍकेडमीचा पुठ्ठ्यांचा बाहूबली बाप्पा

0

पाचोरा | प्रतिनिधी :   येथील गणेश उत्सव परंपरेला आधुनिकता, नाविन्यता, समाजाभिमुखता, जनजागृती, पर्यावरण रक्षण व सामाजिक एैक्याची जोड देणार्‍या शिंदे ऍकेडमीतर्ङ्गे यंदा पुठ्ठ्यांचा बाहुबली बाप्पा तयार करण्यात आला आहे.

टाकाऊ पुठ्ठ्यांपासून आकर्षक पध्दतीने तयार केलेले गणपती बाप्पाचे देखणे रूप भक्तांना मोहीत करणारे असून हा पर्यावरण पुरक गणपती पर्यावरण रक्षणाचा संदेश देतो.

सन २०११ पासून युवीनेते अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखशली शिंदे ऍकेडमीतङ्गर्ष गणेश उत्सव परंपरा पुढे नेण्याचे काम केले जात आहे. येथील गणेश उत्सवात सतत नाविन्यपुर्ण गणपती बनवून त्यातून समाजाला महत्त्वपूर्ण संदेश देण्याचे काम शिंदे ऍकेडमीतर्ङ्गे अखंड सुरू आहे.

असा आहे बाहुबली बाप्पा

यंदाचा टाकाऊ पुठ्ठ्यांपासदून बनवलेला गणपती बाप्पा २० ङ्गुट उंच व ४० ङ्गुट रूंद असून या बाप्पांच्या निर्मितीसाठी ३४० किलो पुठ्ठे वापरण्यात आले आहेत. मुख्य मूर्ती, पार्श्‍वभूमी व सजावट अत्यंत साधी असली तरी त्यात कलाकारांचे कौशल्य प्रतिबिंबीत होत आहे. बाहुबली गणपती बाप्पाचे हात, पाय, बोटे, वस्त्र यातील सुक्ष्म निर्मिती अचंबीत करणारी आहे.

मुर्तीसोबतच ४ स्तंभ व उंदीर यांचे सौंदर्य समग्र देखाव्यात भर घालणारे आहे. मूर्तीच पार्श्‍वभुमीला सजवण्यासाठी बॅकड्रॉप म्हणजेच पुठ्ठ्यांचे खोके लावल्याने थ्रिडी संकल्पना सहजपणे वापरल्याचे दिसत आहे. मूर्तीच्या अंगावरील दागिने, गळ्यातील मोतीहार, मोदक, कपाळावरील त्रिशुल आणि शुभ आशिर्वाद देणार्‍या हातावरील ओम अत्यंत लक्षवेधी आहे.

साध्या पुठ्ठ्यापासून साकारलेल्या या मुर्तीच्या संपूर्ण निर्मितीसाठी कलाकारांनी तब्बल १२ दिवस परिश्रम घेतले आहेत. मुळातच पुठ्ठ्यांची अतिभव्य व सुंदर मुर्ती साकारली असली तरी येथील लाईट इङ्गेक्टस्ने मुर्तीच्या सौंदर्यात सजिवपणा निर्माण झाला आहे. येणार्‍या प्रत्येक भाविकाला मोहीत करणारी व पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी बाहुबली बाप्पाची मूर्ती यंदाचे पाचोरा शहरातील आकर्षण ठरली आहे.

कलाकार व सहकारी

स्थानिय कलावंताच्या कलेला चालना देऊन नाविन्यपूर्ण सण उत्सव साजरा करणार्‍या अमोल शिंदे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेला जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. यंदाच्या बाहुबली गणपती बाप्पाच्या निर्मितीसाठी पाच कलाकारांचे मोलाचे योगदान आहे. प्रा.निरंजन शेलार, राहुल पाटील, जितेंद्र काळे, सुबोध कांतायन व आशिष जगताप यांनी अथक परिश्रमातून हा बाहुबली बाप्पा साकारला आहे.

त्यांच्या या परिश्रमाला करण पवार, सोनू पाटील, भरत चळेकर, अजय पाटील व अक्षय पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या शिवाय या १२ दिवसाच्या निर्माण प्रक्रियेत वैभव शिंपी, सिध्दांत पाटील, राहुल बावचे, अक्षय भोसले, विवेक पाटील व भाग्येश शिंदे यांनीही महत्त्वाचे योगदान दिले आहे.

यातील वरील ५ कलावंतांच्या अंगभूत कलागुणातून अत्यंत कमी कालावधीत हा पुठ्ठ्यांचा बाहुबली गणपती बाप्पा साकारला आहे.

LEAVE A REPLY

*