‘नो एंट्री’ मार्गाने जाणार्‍या सहा बसेसवर वाहतूक पोलिसांची कारवाई

0
जळगाव । दि.29 । प्रतिनिधी-शहरातील स्वातंत्र्य चौकातून भास्कर मार्केटकडे नो एंट्री असलेल्या मार्गाने जाणार्‍या 6 बसेसवर शहर वाहतुक शाखेच्या अधिकार्‍यांनी कारवाई करून बसचालकांकडून प्रत्येकी 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
स्वातंत्र्य चौकातून भास्कर मार्केटकडे व प्रभात चौकातून भास्कर मार्केटमार्ग स्वातंत्र्य चौकात येणार्‍या अवजड वाहनांना शहर वाहतुक शाखेतर्फे या मार्गाने प्रवेश बंद करण्यात आला.

आज दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास प्रभात चौकातून भास्करमार्कट मार्ग स्वातंत्र्य चौक बस स्थानकाकडे जाणार्‍या 6 बसेसवर शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष भामरे यांच्या पथकातील पीएसआय सतिष जोशी, पोहेकॉ. भरत पाटील, अशोक महाजन, पोकॉ. धनराज पाटील, पोना. किरण चौधरी यांनी कारवाई केली.

यात एमएच 20 बीए 0347, एमएच 14 बीएल 1433, एमएच 14 बीटी 3018, एमएच 14 बीटी 2177 यासह दोन एसटी बसेसवर कारवाई करण्यात येवून त्यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*