Type to search

जळगाव

प्रभावी जनसंपर्कासाठी ज्ञानासोबत सामाजिक भान गरजेचे : मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हेमराज बागुल यांचे प्रतिपादन

Share

जळगाव । प्रतिनिधी :  सफरचंद खाली पडते ही झाली माहिती मात्र ते गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडते हे झाले ज्ञान त्यामुळे ज्ञान व ते कसे वापरावे हे सामाजिक भान प्रत्येकाला असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हेमराज बागुल यांनी यांनी केले.

मू.जे. महाविद्यालयातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग व शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभावी जनसंपर्क व त्याचे आयाम या विषयावर के सी ई सोसयटी व मू.जे.महाविद्यालय यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिम्मित आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

यावेळी के.सी.ई.सोसायटीचे सहसचिव अ‍ॅड.पी.एन.पाटील, प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, दिलीप हुंडीवाले, शिक्षणशास्त्रचे प्राचार्य ए.आर.राणे, डॉ.एस.एन.भारंबे, संदीप केदार ,सुभाष तळेले ,जैन इरिगेशनचे किशोर कुलकर्णी, प्रा.शमा सराफ, के.जी.कुलकर्णी तसेच हेमराज बागुल यांच्या सुविद्य पत्नी नीता बागुल,प्रा.प्रशांत सोनवणे ,प्रा.केतकी सोनार ,विद्यार्थी ,शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .प्रास्ताविक प्राचार्य उदय कुलकर्णी ,सुत्रसंचालन अपूर्वा वाणी,मान्यवरांचा परिचय विभागप्रमुख प्रा.संदीप केदार व आभार ए.आर.राणे यांनी मानले .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!