Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

वरणगाव शिवारात मृतावस्थेत बिबट्या आढळला

Share

वरणगाव फॅक्टरी, ता.भुसावळ ।  वार्ताहर :   वरणगाव शिवारात 4 वर्षीय बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. हि घटना दि. 3 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत वृत्त असे की, वरणगाव शिवारातील मन्यारखेडा नाल्यालगत फुलगाव येथील अनिल पाटील यांच्या केळी बागेजवळ नर जातीचा बिबट्या मेंढया-बकर्‍या चारणार्‍या माणसांना दिसला. त्यांनी ही बाब शेतकर्‍यांना सांगितली. शेतकर्‍यांंनी भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे यांना सांगितल्याने त्यांनी वन विभागास माहीती दिली. वनविभागाचे दिपाली जाधव, मुकेश बोरसे, श्री.वानखेडे आदी त्वरीत घटनास्थळी उपस्थित झाले.

या बिबट्याच्या नाकातोंडातून रक्त येत असुन एक दिवसापूर्वी मयत झालेला असावा, शिकारीचे हे प्रकरण नसावे अशी वस्तुस्थीती आहे. या परिसरात गेल्या अनेक वर्षापासुन बिबटे असल्याने शेतकरी व मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पशुवैद्यकिय अधिकारी तडवी यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले.

प्रसंगी वरणगाव पोलीस स्टेशनचे पोहेकॉ मनोहर पाटील, संदीप बडगे, अजय निकम यांनी घटनास्थळी भेट दिली. जवळच विल्हाळे शिवार असुन यापुर्वी परीसरात बिबटया पाहिल्याचे शेतकरी सांगतात. परंतु वनविभागाचे अधिकारी जिल्हाभरात बिबटे नाही अशी बतावणी करतात. परिसरात बकर्‍या व इतर जनावरे फस्त करून माणसावर हल्ले झालेले आहे. शेतकरी रात्री बेरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जातात, अशावेळी त्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!